महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ठाणे पोलिसांची वाहनांच्या काळ्या काचांचा विरोधात कारवाईची मोहीम सुरू - thane breaking news

ठाण्यात आतापर्यंत चारशे वाहनांवर कारवाई करण्यात आली. वाहतूक पोलिसांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांच्या काळ्या काचावरील फिल्म काढणं सुरू केले आहे.

ठाणे पोलीस
ठाणे पोलीस

By

Published : Jan 30, 2021, 8:03 PM IST

Updated : Jan 30, 2021, 8:08 PM IST

ठाणे -ठाणे पोलिसांनी रस्ते सुरक्षा सप्ताहाचे रूपांतर रस्ते सुरक्षा महिन्यामध्ये केले आहे. करोडो रुपयांचा दंड शासन तिजोरीत जमा केल्यानंतर आता ठाणे पोलिसांनी आपला मोर्चा काळ्या काचा असलेल्या वाहनांवर वळवला आहे. ठाण्यात आतापर्यंत चारशे वाहनांवर कारवाई करण्यात आली.

वाहतूक पोलिसांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांच्या काळ्या काचावरील फिल्म काढणं सुरू केले आहे. ठाणे पोलिसांनी स्वतःच्या हाताने आता या फिल्म काढण्याची कारवाई हाती घेतली आहे. ठाणे वाहतूक पोलिसांच्या ठाणे शहर, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, भिवंडी या सर्व विभागांमध्ये ही कारवाई केली जात आहे. या कारवाईत केवळ फिल्म न उतरवता त्यांच्यावर दंडही आकारला जातो आहे. त्यामुळे शासनाचा महसूल वाढीस मदत होत आहे.

बाळासाहेब पाटील, उपायुक्त वाहतूक शाखा
राजकीय पुढाऱ्यांच्या वाहनांवर कारवाई-विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या वाहनांना यावेळी मोठ्या प्रमाणात ब्लॅक फिल्म आढळून आल्या आहेत. अशा नेत्यांवरही कारवाई करून ठाणे पोलिसांनी आपली मोहीम पुढे सुरू ठेवली आहे. काळ्या काचा हे व्हीआयपी असल्याचे लक्षण दाखवण्यासाठी ब्लॅक फिल्म लावल्या जात होत्या. यामुळेच अनेक गुन्हे देखील झाले आहेत. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईने गुन्हे रोखण्यासाठी देखील मदत होणार आहे.

ठाणे पोलिसांची कार्यवाही सुरूच राहणार-

ठाण्यात रस्ते सुरक्षा सप्ताह सुरू असून या काळात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा नियमांचं पालन करावे. यासाठी प्रबोधन केल्या जाते. मात्र यावेळी सप्ताह नसून महिनाभरासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

हेही वाचा-नाशकात भरधाव कंटेनरच्या धडकेत वाहतूक पोलिसाचा मृत्यू

Last Updated : Jan 30, 2021, 8:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details