महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

वसईतील मुस्लीम बांधवांकडून पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत - पूरग्रस्तांसाठी अडीच लाख रूपयांची आर्थिक मदतvv

जामा मस्जीद कामण ट्रस्ट, वसई पुर्व कामण गाव व परिसरातील मुस्लीम बांधवांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी तब्बल दोन लाख पन्नास हजार रूपयांचा मदतनिधी दिला आहे.

वसईतील मुस्लीम बांधवांकडून पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत

By

Published : Aug 17, 2019, 8:15 AM IST

Updated : Aug 17, 2019, 12:38 PM IST

पालघर -जिल्ह्यातील वाळिव पोलीस ठाणे हद्दीतील जामा मस्जीद कामण ट्रस्ट, वसई पुर्व कामण गाव आणि परिसरातील मुस्लीम बांधवांनी बकरी ईदचा सण अत्यंत साधेपणाने साजरा करून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी अडीच लाख रूपयांची आर्थिक मदत केली आहे.

वसईतील मुस्लीम बांधवांकडून पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत

पूरग्रस्त नागरिकांसाठी जमा केलेला अडीच लाख रुपयांचा धनादेश जामा मस्जीद कामणचे अध्यक्ष हजरत हुसेन शेख व इतर सहकाऱ्यांच्या हस्ते वसई पुर्वचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यासाठी देण्यात आला.

या वेळी उप विभागिय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील व वाळिव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले, वसई विभागातील अनेक मुस्लीम बांधव उपस्थीत होते. सामाजिक भान जपत घेतलेल्या पुढाकारासाठी विजयकांत सागर यांच्या हस्ते जामा मस्जीद ट्रस्ट कामण गाव अध्यक्ष व समाजसेवक हजरत हुसेन शेख व इतर सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

Last Updated : Aug 17, 2019, 12:38 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

palghar news

ABOUT THE AUTHOR

...view details