महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

किरीट सोमय्यांनी सेनेला पुन्हा डिवचले; म्हणाले..

एकीकडे शिवसेना मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे करीत असताना दुसरीकडे युतीचेच सरकार येणार असून मुख्यमंत्री मात्र पुन्हा देवेंद्र फडणवीस होणार, असे भाकीत करत किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा सेनेला डिवचले आहे.

किरीट सोमय्या

By

Published : Sep 13, 2019, 8:25 PM IST

ठाणे - माजी खासदार आणि भाजपचे ठाणे लोकसभा प्रभारी किरीट सोमय्या यांनी पुन्हा शिवसेनेला डिवचले आहे. एकीकडे शिवसेना मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे करीत आहे. दुसरीकडे किरीट सोमय्या यांनी युतीचेच सरकार येणार आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार, असे भाकीत केले आहे.

सरकार युतीचेच पण मुख्यमंत्री फडणवीसच होणार; किरीट सोमय्यांनी सेनेला पुन्हा डिवचले

भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांचा 15 सप्टेंबरला ठाणे दौरा आहे. काश्मीरचे 370 आणि 35 अ कलम या विषयावर गडकरी रंगायतन येथे भाजप कार्यकर्ते तसेच नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत, या विषयी माहिती देण्यासाठी भाजप शहराध्यक्ष ऍड संदीप लेले, आमंदार संजय केळकर, गटनेते नारायण पवार यांनी पत्रकार परिषद खोपट येथील भाजप कार्यालयात आयोजित केली होती. यावेळी किरीट सोमय्या यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.

हेही वाचा... विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत मनसेत संभ्रम, सूत्रांची माहिती

निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून युतीच्या जागा संदर्भात अजून चर्चा सुरू आहे. लोकसभा प्रमाणेच विधानसभेला सेना भाजप एकत्र लढण्याची तयारी करत आहेत. मात्र या सर्व प्रक्रियेत मुख्यमंत्री पद हा मुद्दा कळीचा बनत चालला आहे. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा देवेंद्र फडणवीस हेच होणार, असे भाकीत करत किरीट सोमय्या यांनी सेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा... शिवसेनेची यादी आपणच तयार करा, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

जागा वाटपामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याबाबत अद्यााप स्पष्ट झालेले नसले तरीही दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून मात्र युती होणार असल्याचे दावे केले जात आहेत. अशाच प्रकारचा दावा आता भाजपचे ठाणे जिल्हा प्रभारी आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी ठाण्यात केला. त्या वेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापुर्वीच भाजप आणि शिवसेनेची युती होणार असल्याचे स्पष्ट केले असून फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या दाव्याच्या माध्यमातून त्यांनी शिवसेनेला अप्रत्यक्षपणे डिवचल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details