ठाणे- शहरात संस्कार संस्थेच्या तसेच कोकण विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेतकऱयांना आंबा थेट विक्री करता यावा यासाठी 'आंबा महोत्सव' भरविण्यात येतो. शेतकऱयांसाठी ही चळवळ केळकर यांनी १४ वर्षांपूर्वी सुरू केली. त्याला ठाणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.
आंबा महोत्सवाला ठाणेकरांचा उदंड प्रतिसाद - आंबा महोत्सव
शेतकऱ्यांना आंबा थेट विक्री करता यावा यासाठी 'आंबा महोत्सव' भरविण्यात येतो. शेतकऱयांसाठी ही चळवळ केळकर यांनी १४ वर्षांपूर्वी सुरू केली. त्याला ठाणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.
कृषी पणन मंडळ महाराष्ट्र शासन पुरस्कृत असलेल्या महोत्सवात जवळपास १ कोटी १५ लाख ५०० रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास ३० हजार डझन आंबा विक्री करण्यात आला आहे. या महोत्सवालाही ठाणेकरांनी दरवर्षी सारखा विक्रमी व उदंड असा प्रतिसाद दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांचाही फायदा झाला आहे, असे आ. केळकर यांनी सांगून ठाणेतील संस्थेचे आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने आभार व्यक्त केले.
यावर्षी आंब्याचे उत्पादन केवळ ३५% होते. या महोत्सवात रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील हापूस आणि रायवळी व पायरी अशा आंब्यांबरोबर कोकणातील पापड, लोणची, मसाले, कोकम असे विविध पदार्थही विक्रीस होते. या महोत्सवात महिला सक्षमीकरण म्हणून महिला बचत गटांनाही केळकर यांनी स्टॉल उपलब्ध करून दिले होते. या बचत गटांनीही व्यवसायात ५० हजारांपर्यंत विक्री केली.