ठाणे -महापालिका हद्दीत सुमारे 25 लाखांची लोकसंख्या आहे. मात्र, लसीकरण मोहिमेत केवळ 3 लाख 50 हजार ठाणेकरांचे लसीकरण पालिका प्रशासनाला विविध केंद्रावर करण्यात यश मिळाले. लसींच्या अभावाने लसीकरणाच्या मोहिमेला ब्रेक लागला आहे. ठाणेकरांची ग्लोबल टेंडर काढून पाच लाख लसींची मागणी करणार आहे. त्यासाठी ग्लोबल टेंडरची प्रक्रिया सुरू आहे. मुंबई प्रमाणे ठाणे पालिकाही ग्लोबल टेंडर काढण्याची लवकरच प्रक्रिया पूर्ण करणार आहे. त्यानंतर निविदाकारांचा प्रतिसाद मिळण्यावर सर्वकाही अवलंबून आहे. त्यामुळे ठाणेकरांना लसीसाठी प्रतीक्षाच करावी लागणार असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. बिपीन शर्मा यांनी दिली.
ठाण्याची 25 लाखांची लोकसंख्या असलेल्या पालिका प्रशासनाला ठाणेकरांचे लसीकरण करण्यासाठी 50 लाख लसींची गरज आहे. आतापर्यंत 3 लाख 50 नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. तरीही ठाण्यासाठी किमान 40 ते 42 लाख डोसची गरज आहे. त्यासाठीच ठाणे पालिकेने लस खरेदीची तयारी ठेवून 5 लाख लसींसाठी ग्लोबल टेंडर काढण्यात येणार आहे. मात्र, त्याची अवस्थाही मुंबई पालिकेच्या ग्लोबल टेंडर प्रमाणेच असल्याने लसीचा दर कंपनी काय देतात यावर सर्व अवलंबून आहे. संपूर्ण ठाणेकरांच्या लसीकरणासाठी आता चक्क पालिका आयुक्तही लसीच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.
ग्लोबल टेंडर प्रक्रियेची तयारी