ठाणे -ठाणे महानगर पालिकेतThane Municipal Corporation ठेकेदाराने खांबावरील जाहीराती प्रसिध्दीपोटी पालिकेची फसवणुक केली आहे. प्रशासन आणि ठेकेदार यांच्या संगनमताचा प्रत्यय ठाण्यात पाहायला मिळाला आहे. ठाणे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील ३ हजार ८५१ विद्युत पोलवर जाहीराती प्रसिध्द करण्यासाठी महापालिकेने निविदा काढली आहे. त्यासाठी ठाणे महापालिकेच्या तिजोरीत दरवर्षी अडीच कोटींचा निधी देखील जमा होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र मागील तीन वर्षे अशाच पध्दतीने जाहीरातीचा ठेका ज्या ठेकेदाराला देण्यात आला होता, त्यात महापालिकेची फसवणुक झाल्याची माहिती पुढे आली आहे.
प्रशासन आणि ठेकेदार यांच्या संगनमताचा प्रत्ययठाणे महानगर पालिकेच्या महासभेने केलेल्या ठरावानुसार संबधींत ठेकेदाराने ३०८५ खाबांवर जाहीरात प्रसिध्द करणं अपेक्षित होते. मात्र महासभेच्या ठरावाला केराची टोपली दाखवत, संबधीत ठेकेदाराने केवळ २५२१ खाबांवरच जाहीरात प्रसिध्द केल्याचा ठराव महापालिका प्रशासनाशी बोलून करुन घेतला. त्यातही पालिकेला यासाठी १०.३५ कोटींचे उत्पन्न अपेक्षित असतांना पालिकेच्या तिजोरीत ठेकेदाराने केवळ ३.५९ कोटीच दिल्याची माहिती समोर आली आहे. आता ठेका संपुष्टात आल्यानंतरही वर्षभरापासून ठेकेदाराकडून खांबावर जाहीरात प्रसिध्द केल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली Thane Municipal Corporation Advertisement Scam आहे.
महापालिकेची फसवणुकच झाली असल्याचा दावा ठाणे महापालिकेने यापूर्वी लोकसहभागातून शहराच्या विविध भागात शौचायले उभारली आहेत. त्या शौचालयांच्या वरील बाजूस जाहीरात करण्याचे हक्क खाजगी ठेकेदाराला प्रदान करण्यात आले आहेत. मात्र त्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण ताजे असतांना, आता खांबावरील जाहीरातपोटी देखील महापालिकेची फसवणुक झाल्याची गंभीर बाब समोर येत आहे. ठाण्यातील दक्ष नागरीक चंद्रहास तावडे यांनी माहिती अधिकारात ही माहिती उघड केली आहे. महापालिकेने ८ डिसेंबर २०१७ रोजी संबधींत ठेकेदाराला कार्यादेश दिला होता. त्यानुसार त्याने ३०८५ खाबांवर जाहीराती प्रसिध्द करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यासाटी महापालिकेला तीन वर्षासाठी १०.३५ कोटींचे उत्पन्न पालिकेच्या तिजोरीत येणे अपेक्षित होते. तशा आशयाचा ठराव देखील महासभेत मंजुर करण्यात आला होता. त्यानुसार पहिल्या वर्षी २.५२ कोटी, दुसऱया वर्षी ३.०६ कोटी व तिसरे वर्षी ४.७७ कोटी असे १०.३५ कोटी पालिकेला मिळणो अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात ठेकेदाराने महासभेचा अवमान करीत महापालिका स्तरावर संबधींत ठेकेदाराने केवळ २५२१ विद्युत खाबांवर जाहीराती प्रसिध्द केल्या होत्या. त्यातून पालिकेला तीन वर्षात केवळ ३.५९ कोटीच दिले असून उर्वरीत ६.७६ कोटी रुपये दिलेच नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेची ही फसवणुकच झाली असल्याचा दावा तावडे यांनी केला आहे.