महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

...त्या ठिकाणी राणेंचा पराभव निश्चित - महापौर नरेश म्हस्के - ठाणे महापौर नरेश म्हस्के

ज्या ज्या ठिकाणी राणे हे जातील त्या ठिकाणी त्यांचा पराभव अटळ आहे, असे देखील ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले आहे.

नरेश म्हस्के
नरेश म्हस्के

By

Published : Aug 25, 2021, 2:18 AM IST

ठाणे -केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर ठाणे महानगरपालिकेच्या बाहेर सेनेकडून फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला. यावेळी महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम सह अनेक नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. राणे यांना शिवसेनेवर भुंकण्याकरीता भाजपाने पाळला आहे, अशी टीका महापौर नरेश म्हस्के यांनी केली आहे. तसेच ज्या ज्या ठिकाणी राणे हे जातील त्या ठिकाणी त्यांचा पराभव अटळ आहे, असे देखील ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले आहे.

भाजपा कार्यालयावर शाई फेक झाल्यावर शिवसेना महापौरांनी नौपाडा पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर भाजपा कार्यालयावर जाताना पोलिसांनी रोखले त्यानंतर भाजपा कार्यकर्तेही काठी घेऊन कार्यालयात जमा झाले होते. पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, मात्र ठाण्यात दिवसभर तणाव पाहायला मिळाले.

ABOUT THE AUTHOR

...view details