महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Vasant Marathe passes away : ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे यांचे निधन

ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे (Vasant Marathe passes away) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. १९३४ साली जन्मलेले वसंत नारायण उर्फ योगीदास मराठे हे १९५६ सालापासून ठाण्यात राहत होते. समाजसेवेची आवड असल्याने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आणि त्यानंतर शिवसेनेच्या स्थापनेपासूनच त्यांचा शिवसेनेत सहभाग होता.

vasant marathe
वसंत मराठे

By

Published : Jan 14, 2022, 9:18 PM IST

ठाणे -ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे (Vasant Marathe passes away) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. १९३४ साली जन्मलेले वसंत नारायण उर्फ योगीदास मराठे हे १९५६ सालापासून ठाण्यात राहत होते. समाजसेवेची आवड असल्याने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आणि त्यानंतर शिवसेनेच्या स्थापनेपासूनच त्यांचा शिवसेनेत सहभाग होता. १९६७ सालच्या निवडणुकीत शिवसेनेतर्फे ठाणे नगरपालिकेवर त्यांची निवड झाली आणि ते ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष झाले होते. मराठे यांचे वयाच्या ८८ वर्षी अखेरचा श्वास घेतला असून ठाण्यातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

  • कोण आहेत वसंत मराठे?

वसंत मराठे हे दोन वर्ष नगराध्यक्ष आणि सहा वर्ष नगरपालिकेचे सभासद राहिले. त्यांनी राजकारणातून संन्यास घेऊन धर्मग्रंथांचा अभ्यास सुरू केला होता. वसंत मराठे यांनी १९९९ सालापासून श्रीमद् भगवद्गीतेचा अभ्यास, मनन, चिंतन आणि प्रवचनाच्या माध्यमातून भगवद्गीतेचा प्रचार आणि प्रसार हेच त्यांचे अखेरपर्यंत जीवित कार्य राहिले.

  • ठाण्यातील शिवसेनेचा शिलेदार -

ठाण्यात शिवसेनेची पहिली सत्ता आली आणि ठाणे नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने सत्ता स्थापन केली. ठाणे नगरपालिकेत पहिला शिवसेनेचा नगराध्यक्ष वसंत मराठे यांच्या रूपाने बसला. सत्तेची पहिली संधी शिवसेनेला ठाणे नगरपालिकेने दिली. यावेळी १३ ऑगस्ट १९६७ ला ठाणे नगरपालिकेची निवडणूक झाली आणि १४ ऑगस्टला लगेच निकाल लागला. एकूण ४० जागांपैकी १५ अधिकृत आणि ६ पुरस्कृत असे शिवसेनेचे २१ उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे शिवसेना सत्तेवर येण्याचा रस्ता मोकळा झाला होता. या निवडणुकीत जनसंघाचे ८, प्रजासमाजवादीचे ३, अपक्ष ८ उमेदवार निवडून आले.

ठाणे नगरपालिकेच्या अध्यक्षपदी वसंत मराठे आणि उपाध्यक्षपदी अॅड. अरविंद दीक्षित हे निवडून आले. या दोघांच्या सत्कारासाठी स्वतः शिवसेनाप्रमुख उपस्थित राहिले होते. शिवसेनेच्या स्थापनेपासून ते सत्तेची पहिली मुहूर्तमेढ रोवणारा शिलेदाराच हरपला असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details