नवी मुंबई :उलवे परिसरात राहणाऱ्या पोटच्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापाला एनआरआय पोलिसांनी गजाआड केले आहे. संबधित व्यक्तीची मुलगी अत्याचाराला कंटाळून घर सोडून निघून गेल्यावर या घटनेचा उलगडा झाला.
बापाच्या अत्याचाराला कंटाळून घरातून पळाली मुलगी..
उलवे येथे राहणाऱ्या संबंधित व्यक्तीची 13 वर्षीय मुलगी वडील करीत असलेल्या कृत्यामुळे घरातून पळून गेली होती. या प्रकरणी संबधित व्यक्तीने मुलगी हरवली असल्याची तक्रार एनआरआय पोलीस ठाण्यात शनिवारी दाखल केली होती.
पोटच्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम बाप गजाआड पोलिसांनी तपास करताच झाला प्रकरणाचा उलगडा..
मुलगी हरवल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरवात केली. त्यानंतर संबंधित व्यक्तीची मुलगी पोलिसांना नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात सापडली. पोलिसांनी पळून जाण्याचे कारण विचारल्यानंतर त्यातून धक्कादायक खुलासा समोर आला.
नराधम पिता करीत होता पोटच्या दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार..
13 वर्षीय मुलगी व तिची 14 वर्षीय मोठी बहीण या दोन्ही मुलींवर त्यांचे वडील लैंगिक अत्याचार करत असल्याची मुलींनी पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी संबंधित बापाला एनआरआय पोलिसांनी अटक केले असून, त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा :मुंबईत कोरोनाचा उद्रेक सुरुच; मंगळवारी 4758 नवे रुग्ण, 10 जणांचा मृत्यू