ठाणे - ठाण्यातील रायगड गल्ली भागात शिवसेना (Shiv Sena) आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी पहिला पोस्टर लागला होता. हा पोस्टर लागल्यानंतर या पोस्टरची चर्चा संपूर्ण ठाण्यामध्ये (Thane) सुरू झाली. कारण ठाण्यातील जवळपास सर्वच शाखा विभाग प्रमुख, नगरसेवक यांनी आपला पाठिंबा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिला आहे. अशा वेळी विरोधात लागलेल्या बॅनरमुळे शिवसेने मधल्या बंडाच्या विरोधात निष्ठावंत शिवसैनिक आणि लावलेल्या पोस्टरची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली.
मध्यरात्री हा पोस्टर्स गायब झाला आहे. हे पोस्टर लावर्या या कार्यकर्त्यांनी या संदर्भात नौपाडा पोलिस (Police) ठाण्यात तक्रार दिली आहे. यामुळे नौपाडा पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त लावला आहे. आणि यापुढे पोस्टर कोणी पळवला याची माहिती घेत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास नौपाडा पोलिस करत आहेत. तर, दुसरीकडे शिंदे गटात विधानसभा उपाध्यक्षांच्या कारवाईला कोर्टात आव्हान देण्यासाठीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. यामुळे आता राजकारणासोबत कायदेशीर लढाई सुरू होणार असल्याचं दिसत आहे.