महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Thane Crime : डोंबिवली बँकेत चोरी करणारे 3 सराईत आरोपी गजाआड; ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

डोंबिवली मानपाडा ( Dombivli Manpada ) येथील ICICI बँक धाडसी चोरीचा गुन्हा 9 जुलै ते 11 जुलै दरम्यान झाली होती. बँकेतील ( Bank ) या चोरीत 12 कोटी 20 लाख रूपयांचे रोख रक्कम चोरटयांनी लांबवली होती. या प्रकरणी अज्ञात ओपीच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात धाडसी चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

By

Published : Jul 19, 2022, 7:19 AM IST

Updated : Jul 19, 2022, 10:24 AM IST

Thane Crime
Thane Crime

ठाणे -ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील डोंबिवली ( Dombivli ) मानपाडा येथील ICICI बँकेत धाडसी चोरी करून कोट्यवधींची रोकड लांबविणाऱ्या तिंघा आरोपीना ठाणे शहर मालमत्ता गन हे शाखेच्या पथकाने 5 कोटी 80 लाख रूपयांची रोकडीसह गजाआड केले आहे. धाडसी चोरीचा ( Theft ) गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 4 दिवसात गुन्हातील आरोपीना ( accused ) बेड्या ठोकण्यात आले आहेत. तसेच कोट्यवधींची रोकड त्याच्याकडून हस्तगत करण्यात पोलीस ( Thane Police ) पथकाला यश आले आहे. अटक आरोपी इसरार अबरार हुसेन कुरेशी ( वय- 33 ) आरोपी शमशाद अहमद रियाज अहमद खान ( वय - 33 ), अनुज प्रेमशंकर गिरी ( वय - 30 ) यांचा समावेश आहे.

Thane Crime

मानपाडा पोलीसात चोरीच्या गुन्ह्याची नोंद -डोंबिवली मानपाडा ( Dombivli Manpada ) येथील ICICI बँक धाडसी चोरीचा गुन्हा 9 जुलै ते 11 जुलै दरम्यान झाली होती. बँकेतील ( Bank ) या चोरीत 12 कोटी 20 लाख रूपयांचे रोख रक्कम चोरटयांनी लांबवली होती. या प्रकरणी अज्ञात ओपीच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात धाडसी चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान सादर प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांसोबतच ठाणे शहर मालमत्ता गुन्हे शाखेचे पथक तपास करत होते.

या ठिकाणी आरोपीला अटक - पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि खबऱ्यांच्या गोपनीय माहितीनुसार पोलीस पथकाने 18 जुलै रोजी 9:30 वाजण्याच्या सुमारास मित्तल मैदानाजवळ, सार्वजनिक रोड मुब्रा ठाणे या ठिकाणी इसरार अबरार हुसेन कुरेशी याला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे चोरीच्या गुन्ह्यातील अन्य आरोपी शमशाद अहमद रियाज अहमद खान, अनुज प्रेमशंकर गिरी यांची माहिती दिल्यानंतर पथकाने दोघांना अटक केली आहे. या दोघांकडून 5 कोटी 80 लाख रोकड हस्तगत केली आहे. तर आरोपींकडून 10 लाख 2 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

4 दिवसात लागला शोध -अवघ्या 4 दिवसात धाडसी चोरीच्या बँकेतील चोरीच्या गुन्ह्यात 3 आरोपीना अटक करून त्यांच्याकडून 5 कोटी 80 लाखाची रोकड हस्तगत करण्याची धडक कारवाई ठाणे शहर मालमत्ता गुन्हे शाखेच्या पथकांनी केली आहे.

हेही वाचा -Gold Silver Rates : चांदीच्या दरात 400 रुपयांची वाढ; सोने मात्र राहिले स्थिर, जाणून घ्या काय आहेत आजचे दर

Last Updated : Jul 19, 2022, 10:24 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details