ठाणे - अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायलयाने जामीन मंजूर (Thane Court Bail to Ketaki Chitale) केला आहे. तिला अॅट्रोसिटी अंतर्गत नवी मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर आज ठाणे न्यायालयाने अखेर तिला जामीन मंजूर केला. २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर करण्यात आला आहे. नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात २०२० साली अॅट्रोसेटी कायद्याअंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, जामीन मिळाल्यानंतरही केतकीचा मुक्काम 21 जूनपर्यंत तुरुंगातच असणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या पोस्ट प्रकरणी 21 जूनला न्यायालयात सुनावणी होणार आहे.
काय आहे प्रकरण -नवी मुंबई पोलिसांनी केतकी चितळेला अटक केली होती. तिला ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. ठाणे न्यायालयात याप्रकरणी आज सुनावणी झाली. त्यानंतर केतकीला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.