ठाणे -शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणारी अभिनेत्री केतकी चितळे ( Ketki Chitale Bail ) हिला अखेर ठाणे न्यायालयाने ( Thane Court ) २० हजाराच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर केला आहे. केतकीला शरद पवार आणि रबाळे पोलीस ठाण्यातील अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात ( crime of atrocity ) जामीन मिळाल्याने आता केतकीच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. गुरुवारी ( 23 जून ) रोजी केतकी कारागृहाबाहेर येण्याची शक्यता आहे. कळवा पोलीस ठाण्यात केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या सोबतच अनेक पोलीस ठाण्यात केतकी विरोधात गुन्हे दाखल आहेत. ठाणे गुन्हे शाखेने केतकीला अटक केली होती.
१४ मे ते २२ जून केतकीचा कोठडी प्रवास : कळवा पोलीस ठाण्यात केतकी चितळे हिच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाणे गुन्हे शाखेने केतकी चितळेला १४ मे रोजी कळंबोली येथून ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडीची प्रवास केतकी चितळेचा सुरु झाला. त्याला २२ जून, २०२२ रोजी ठाणे न्यायालयात जामीन मंजूर झाल्यानंतर फुलस्टॉप लागला. २०२० मध्ये केतकीच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होता. याच गुन्ह्यात केतकीने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र तो न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर ना पुन्हा अर्ज केला. रबाळे पोलिसांनी अटक केली. मात्र शरद पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल होताच रबाळे पोलिसही अटक करण्यात पुढे आले. त्यांनी केतकी चितळे यांचा ताबा घेतला. त्यानंतर आठवड्यापूर्वी केतकीला अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात २५ हजाराच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला. मात्र कळवा पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात केतकी चितळे न्यायालयीन कोठडीत होती.