ठाणे – अटकेत असलेले ठाणे-पालघर मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या जामीन अर्जावर आज ठाण्याच्या सत्र न्यायालयात सुनावणी होणार होती. कापूरबावडी पोलिसांनी विनंती केल्याने न्यायालय उद्या सुनावणी घेणार आहे.
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ठाणे पालघर मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांना तडीपारीची नोटीस बजाविण्यात आली आहे. या प्रकरणात कापूरबावडी पोलीस आज बाजू मांडण्यासाठी न्यायालयासमोर हजर होणार होते. परंतु बुधवारी झालेल्या अतिवृष्टीचे कारण देत त्यांनी सुनावणी पुढे ढकलण्याची न्यायालयाला विनंती केली. अतिवृष्टीमुळे आवश्यक असलेला रिपोर्ट तयार करणे जमले नसल्याचे कापूरबावडी पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. उद्या सुनावणी करावी, ही पोलिसांनी केलेली विनंती न्यायालयाने मान्य केली.