ठाणे - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्याविरुद्धचे अजामीनपात्र वॉरंट ठाणे न्यायालयाने आज रद्द (Thane Court Non-bailable Warrant Cancelled) केले आहे. ठाणे पोलिसांना तपासात सहकार्य करण्याचे निर्देश परमबीर सिंग यांना न्यायालयाने दिले आहेत.
- या प्रकरणात मिळाला दिलासा -
परमबीर सिंग यांनी आज ठाणेनगर पोलीस स्टेशनला हजेरी लावली होती. सोनू जालानने मोक्का न लावण्यासाठी खंडणी मागितल्याचा आरोप परमबीर सिंग यांच्यावर केला होता. तसेच तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी ठाणे न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. त्यानंतर सिंग हे न्यायालयात हजर झाले आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. न्यायालयाने या प्रकरणी 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अजामीनपात्र वॉरंट रद्द केले आहे. त्यामुळे सिंग यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
- गोरेगावातील खंडणी प्रकरणातही अजामीनपात्र वॉरंट जारी आहे-