महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

प्रत्यक्ष महासभा होण्यासाठी प्रयत्नशील राहू; शरद पवारांचे पालिकेतील नेते, नगरसेवकाला आश्वासन

आयत्या वेळेच्या ठरावांसह चुकीच्या पद्धतीने ठाणे महानगर पालिकेची सभा होत आहे. या बाबत आपण संबधितांशी चर्चा करून प्रत्यक्ष महासभा होण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण आणि ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांना दिले.

Shanu Pathan meets Sharad Pawar
शानू पठाण शरद पवार भेट

By

Published : Jun 7, 2021, 8:52 PM IST

ठाणे -आयत्या वेळेच्या ठरावांसह चुकीच्या पद्धतीने ठाणे महानगर पालिकेची सभा होत आहे. या बाबत आपण संबधितांशी चर्चा करून प्रत्यक्ष महासभा होण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण आणि ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांना दिले.

माहिती देताना ठाणे महानगर पालिकेतील विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण

हेही वाचा -बांधकाम विकासकांच्या टोळीने शेतकऱ्याला लावला ३७ कोटींचा चुना; गुन्हा दाखल

ठाणे महानगर पालिकेत प्रत्यक्ष महासभा होत नसल्याने अनेक चुकीच्या गोष्टींचा पायंडा पाडला जात आहे. या संदर्भात गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या सुचनेवरून, तसेच शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण आणि ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी महापालिकेतील कारभाराबाबत अनेक मुद्दे पवार यांच्या निदर्शनास आणून दिले.

गेली अनेक वर्षे सभागृहाचे संख्याबळावर कामकाज करून त्यामध्ये नगरसेवकांवर अन्याय केला जात आहे. अनेक महत्वाचे विषय टाळले जात आहेत. जनतेच्या हितापेक्षा स्व हिताच्या विषयांवर अधिक भाष्य करण्यात येत आहे. किंबहुना असेच ठराव मंजूर करण्यात येत आहेत. कोविडच्या काळात ऑनलाइन सभा घेतली जात असली तरी त्यामध्ये अनेक नगरसेवकांना बोलू दिले जात नाही. त्यांचे आवाज म्युट करून जनतेचे प्रश्न मांडणार्‍या नगरसेवकांची मुस्कटदाबी केली जात आहे. अनेकदा तर आयत्या वेळच्या विषयांच्या नावाखाली अनावश्यक विषयांना मंजुरी देण्यात येत असते. त्याचा गोषवाराही नगरसेवकांपर्यंत पोहचलेला नसतो. अर्थसंकल्पाच्या बाबतीत तर गेल्या दोन-तीन वर्षांपासून अनागोंदीच माजलेली आहे. अर्थसंकल्प वेळेत मंजूर केला जात नसल्यामुळे प्रभागाच्या विकासकामांमध्ये बाधा येत आहे. नगरसेवकांना आपल्या प्रभागातील समस्यांचा निपटारा करता येत नाही. जनतेच्या समोर नगरसेवकांना मान खाली घालावी लागत आहे. महासभा नियमानुसार होतच नाही. त्यामुळे, चुकीचे ठराव पारीत केले जात आहेत. या ठरावांची अंमलबजावणी प्रशासनाकडून होऊ नये, अशा मागण्या विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण आणि ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी शरद पवार यांच्यासमोर मांडल्या.

शरद पवार यांनी लवकरच अडचणी सोडवण्याचे दिले आश्वासन

सभागृह सर्व सदस्यांना खुले करून थेट महासभा घेण्याचा निर्णयही लवकरच घेण्यात येणार आहे. प्रत्यक्ष महासभा घेण्यासंदर्भात आपण संबधितांशी चर्चा करणार आहोत. ठाणे पालिकेतील अनागोंदी संदर्भातही आपण संबधितांशी चर्चा करू, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले. दरम्यान, प्रत्यक्ष महासभा घेण्यासाठी आपण पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांचीही भेट घेणार आहोत, असे शानू पठाण यांनी सांगितले.

हेही वाचा -तृतीयपंथीय हक्क संरक्षण समितीवर उल्हासनगरचे डॉ. नांबियार यांची नियुक्ती

ABOUT THE AUTHOR

...view details