ठाणे -ठाणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांना गुरुवारी संध्याकाळी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने ५ लाख रुपये घेताना अटक केली. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा -'लसीचा केवळ दीड दिवस पुरेल एवढाच साठा, ५-६ दिवसांत ऑक्सिजनची कमतरता भासेल'
डॉ. राजू मुरुडकर हे ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख असून त्यांनी १५ लाखाची मागणी केली होती. त्यापैकी ५ लाख रुपये घेताना ऐरोली येथून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा लावून अटक केली. मुरुडकर यांनी एका कंपनीकडून 15 लाख रुपयांची मागणी केली होती. ती कंपनी ठाणे महानगरपालिकेला व्हेंटिलेटर पुरवणार होती. एकूण कंत्राट 1.5 कोटींचे होते. त्याचे दहा टक्के लाच म्हणून मुरूडकर यांनी मागितले होते. एका खासगी हॉस्पिटलमध्ये ऐरोली येथे हा व्यवहार होणार होता. त्याआधीच लाचलुचपत विभागाने तिथे सापळा लावून मुरुडकर यांना पकडले.