ठाणे- मोठ्या प्रकल्पांमुळे ठाणे पालिकेची तिजोरी रिक्त होण्याच्या उंबरठ्यावर आली आहे. त्यात पालिकेचा अर्थसंकल्प मार्च उजाडल्यानंतरही अद्याप सादर न झाल्याने पालिका तिजोरीला आर्थिक ग्रहण लागल्याचे चित्र आहे. पालिका कर्मचाऱ्यांचा महिन्याच्या एक किंवा दोन तारखेला होणारा पगार हा आता ५ मार्चला झाला आहे. तर, निधी नसल्याने अनेक नगरसेवकांची प्रभागातील कामे रेंगाळली असल्याचे चित्र आहे.
पालिका आयुक्तांनी पदभार सोडल्याने आता अतिरिक्त आयुक्त - १ राजेंद्र अहीरवर हे ११ मार्चला अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे पालिका ३ हजार कोटी रुपयांच्या कर्जात आहे. शहरात मोठ्या रक्कमेचे अनेक प्रकल्प सुरू असल्याने पालिकेला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. हे मोठे प्रकल्प परवडणारे नसून सुटा बुटातील प्रकल्प लादल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होईल व त्यामुळे कदाचित पालिका कर्मचाऱ्यांना वेतन देण्याची पंचाईत होईल, असे पत्र भाजप नगरसेवकाने दिले होते, ते खरे ठरले.
पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा एक किंवा दोन तारखेला होणारा पगार हा ५ मार्चला झाला आहे. तर, दुसरीकडे अनेक नगरसेवकांच्या विकासकामांच्या फायली तयार आहेत. मात्र, ती कामे करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून निधी मिळत नसल्याने प्रलंबित पडली आहेत.
अर्थसंकल्प 11 मार्चला -