महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शुक्रवारी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार - News about water supply to Thane city

ठाणे महानगरपालिकेच्या पिसे येथील अशुद्ध जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. यामुळे शहराला शुक्रवार आणि शनिवारी पाणी पुरवठा होणार नसल्याचे महापालिकेने सांगितले आहे.

Thane city's water supply will be closed on Friday
शुक्रवारी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार

By

Published : Feb 13, 2020, 10:47 AM IST

ठाणे - महानगरपालिकेच्या पिसे येथील अशुध्द जलशुध्दीकरण केंद्रात पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. यामुळे शहराला होणारा पाणी पुरवठा शुक्रवार (१४ फेब्रुवारी) सकाळी ९ ते शनिवार (१५ फेब्रुवारी) सकाळी ९ पर्यंत बंद राहणार आहे.

शुक्रवारी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार

राजणोळी नाक्याजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या कामांतर्गत खोदकाम करताना मुख्य जलवाहिनीमधून पाण्याची गळती सुरू झाली आहे. यामुळे पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने शहराला पाणी पुरवठा होणार आहे. यामुळे पाण्याचा योग्य तो वापर करून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details