ठाणे - रेशनिंग दुकानांतून सर्वसामान्यांना योग्य धान्य मिळणे गरजेचे होते. परंतु गुरुवारी भाजपच्या महिला मोर्चाने ज्ञानेश्वर नगर भागातील गंगाधर नगर येथे टाकलेल्या रेशनिंग दुकानाच्या धाडीत नागरिकांना कमी धान्य दिले जात असल्याची गंभीर बाब उघडकीस आली. या दुकानाप्रमाणोच शहरातील इतर रेशनिंग दुकानांचीही पोलखोल केली जाईल, असा इशारा यावेळी भाजपच्या ठाणे शहर महिला अध्यक्षा मृणाल पेंडसे यांनी दिला.
ठाण्यातील काही भागातील रेशनिंग दुकानांच्या विरोधात मागील काही दिवसापासून भाजप महिला मोर्चाकडे तक्रारी येत होत्या. त्या अनुषंगाने गुरुवारपासून महिला मोर्चाच्यावतीने शहरातील सर्वच रेशनिंग दुकानांची पाहणी करून झाडाझडती करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार गुरुवारी पहिल्याच दिवशी ज्ञानेश्वर नगर भागातील गंगाधर नगर भागातील रेशनिंग दुकानाची पाहणी केली. हा दुकानदार जास्तीचे धान्य मिळत असतानाही सर्वसामान्यांना मात्र कमी धान्य दिले जात असल्याची पोलखोल यावेळी महिला मोर्चाने केली. त्यानुसार या दुकानदाराने ही चूक केल्याचे मान्य केले. त्यानंतर ज्यांचे धान्य कमी देण्यात आले होते. त्यांना बोलावून ते धान्य त्यांना देण्यात आले. यावेळी महिला मोर्चाने या रेशनिंग दुकानदाराची चांगलीच कान उघाडणी केली.
रेशनिंग दुकानदारांची भाजप महिला मोर्चाकडून पोलखोल हेही वाचा-सेबीकडून किशोर बियानीसह त्यांचे बंधु अनिल यांच्यावर एका वर्षाची बंदी
नागरिकांमध्ये जनजागृती
सरकारने जी लिंक दिलेली आहे, त्यानुसार प्रत्येकाला ते मिळते आहे का? त्या लिंक विषयीदेखील सर्वसामान्यांना माहिती नाही. त्यामुळे त्यांच्यातही जनजागृती करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. या पाहणी दौऱ्याच्या माध्यमातून केवळ महिलांना हक्काचे धान्य मिळते का नाही हाच या मागचा प्रमुख उद्देश असल्याचे महिला मोर्चाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.
हेही वाचा-एलआयसीचा आयपीओ दिवाळीत खुला होणार
कोरोना काळात शुभम अग्रवाल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अनेक सर्वसामान्यांना त्यांचे हक्काचे रेशन मिळते का नाही, यासाठी खुप काम केले आहे. त्यामुळे त्यांना रेशनिंग दुकानांविषयी किंवा प्रत्येकाला किती धान्य मिळायला हवे याची माहिती आहे. त्यानुसार तेदेखील या पाहणी दौऱ्यात यावेळी उपस्थित होते.
तक्रारीनंतर ही कारवाई
भाजपच्या ठाणे शहर महिला अध्यक्षा मृणाल पेंडसे म्हणाल्या की, आमच्याकडे रेशनिंग दुकानांच्याबाबत तक्रारी आल्या होत्या. त्याची शहनिशा करण्यासाठी रेशनिंग दुकानांची झाडाझडती करण्यात येत आहे. प्रत्येक नागरीकाला आपल्या हक्काचे धान्य मिळावे, हाच आमचा प्रमुख उद्देश आहे. त्यानुसार हा पाहणी दौरा करण्यात आला. परंतु पहिल्याच झाडाझडतीमध्ये रेशनिंग दुकानदाराने धान्यचा काळाबाजर केला असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे शहरातील सर्व रेशनिंग दुकानांची पाहणी करून पोलखोल केली जाईल, अशी माहिती भाजप महिला मोर्चा अध्यक्षांनी दिली.