ठाणे -सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या शिवसेना पक्षाचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगाने आवश्यक कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार शिंदे गटाकडून आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करण्यात आली असली तरी, उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्याकडून मात्र बोगस सत्यप्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली आहेत.
बोगस प्रतिज्ञापत्र घोटाळा - या सत्यप्रतिज्ञापत्राची ( Uddhav Thackeray submitted bogus affidavit ) संख्या साडेतीन लाखांच्या घरात असल्याने हा महाराष्ट्रातील तेलगी घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा ( Bogus Affidavit Scam ) असून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करून गैरवापर केल्याचा आरोप बाळासाहेच्या शिवसेनचे प्रवक्ते नरेश म्हस्के ( Shiv Sena spokesperson Naresh Mhaske ) यांनी केला असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्षच बोगस असल्याचे ते म्हणाले. ठाकरेंच प्रतिज्ञापत्र घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप म्हस्के यांनी केला आहे.
सर्व प्रतिज्ञापत्र खोटी? -८ ऑक्टोबर २०२२ रोजी मुंबईच्या निर्मलनगर पोलीस स्टेशन येथे एका सर्वसामान्य नागरिकाच्या तक्रारीनुसार भारतीय दंड संहिता कलम ४२० / ४६५ नुसार गुन्हा दाखल आहे. सदर दिवशी पोलीसांनी मा. न्यायालय, वांद्रे, मुंबई याच्यासमोर असलेल्या काही नोटरी करणाऱ्या कार्यालयांवर धाडी टाकल्या असता, तेथे ४ हजार ६८२ सत्यप्रतिज्ञापत्र आढळून आली होती. ती संबंधित विभागाने जप्त देखील केली आहेत. सदरची सत्यप्रतिज्ञापत्र ही महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या नागरिकांच्या नावे असल्याचे कळते.
करोड़ों रुपयांचा खर्च -सत्यप्रतिज्ञासाठी करोड़ों रुपयांचा खर्च झालेला आहे. यामध्ये कायद्याचे कुठलेही पालन न करता बेकायदेशीररित्या स्टॅम्प पेपर, लाल शिक्के, नोटरीचे स्वरस्टॅम्प याच्या माध्यमातून अनोळखी नागरिकांच्या आधारकार्डच्या झेरॉक्स पोलीसांकडून जप्त करण्यात आले आहेत. सदर सत्यप्रतिज्ञापत्रातील काही ठराविक नागरिकांना संपर्क केला असता त्या सर्वांनी आम्ही अशी कुठलीही सत्यप्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी केली नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ही सर्वच्या सर्व प्रतिज्ञापत्र खोटी असल्याचा दाट संशय निर्माण होतो.