ठाणे - ठाण्यातील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला मध्यरात्री झेंडा फडकावण्याची परंपरा आहे गेली कित्येक दशके ही परंपरा सुरु असून स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केली ही परंपरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायम ठेवली आहे मात्र या वर्षी मध्यरात्रीच्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला ठाकरे गटातील शिवसैनिकांना परवानगी नाकारली आहे त्यामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे स्थानिक नौपाडा पोलिसांनी कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून खासदार राजन विचारे जिल्हाप्रमुख केदार दिघेयांच्यासह अनेक शिवसैनिकांना नोटीस बजावली आहे
स्थानिक शिवसैनिकांचा विरोध जिल्ह्याचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंडखोरी करत भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केले असून ते राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून ठाणे जिल्ह्यावर ते एकहाती नेतृत्व करत आहेत त्यामुळे त्यांनी शिवसेनेपासून फारकत घेतल्यापासून जिल्ह्यातील बहुतांशी पदाधिकारी आणि माजी नगरसेवक शिंदे यांच्या सोबत गेले आहेत तर बहुतांशी निष्ठावंत शिवसैनिक मात्र अजूनही ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आहेत बऱ्याच शाखाही शिंदे गटाने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला मात्र स्थानिक शिवसैनिकांनी विरोध केल्याने चंदनवाडी शाखा जिल्हा मुख्य शाखा अद्यापही निष्ठावंत शिवसैनिकांच्या ताब्यात आहेत
नौपाडा पोलिसांनी नोटिसा पाठवल्या दर वर्षी स्वतंत्रदिनाच्या पूर्व संध्येला पालकमंत्री असलेले एकनाथ शिंदे जिल्हा शाखेत ध्वजारोहण करत होते यंदा ते मुख्यमंत्री असले तरी ठाण्यात येऊन ते ध्वजारोहण करणार असल्याने जर ठाकरे गटाचे शिवसैनिकही ध्वजारोहणाला आले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे वाटल्याने पोलिसांनी खासदार राजन विचारे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह ठाकरे गटाच्या बऱ्याच शिवसैनिकांना नौपाडा पोलिसांनी नोटिसा पाठवल्या आहेत