महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Cars vandalized in Thane: गुंडांचा हैदोस! लुटमार करीत गाड्यांची केली तोडफोड; घटना सीसीटीव्हीत कैद

ठाण्यात गावगुंडाचा हैदोस पाहायला मिळाला आहे. कॅम्प नंबर तीनच्या सुभाष नगर परिसरात गाड्यांची तोडफोड ( vehicles Vandalized ) करण्यात आली. काही दिवसापूर्वीच गावगुंडांच्या टोळक्याने तलवारीचा धाक दाखवून लुटमारीसह वाहनांची तोडफोड केली होती.

cars vandalized
गाड्यांची तोडफोड

By

Published : Jul 17, 2022, 5:28 PM IST

ठाणे -उल्हासनगर शहरात पुन्हा एकदा गावगुंडाचा हैदोस पाहायला मिळाला आहे. या गावगुंडांनी मध्यरात्रीच्या सुमारास कॅम्प नंबर तीनच्या सुभाष नगर परिसरात सर्वसामान्य नागरिकांना लुटले ( Subhash Nagar Citizens Robbed ) आहे. शिवाय दहा ते बारा गाड्यांची तोडफोड केली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे ( incident caught in CCTV ). याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ( case registered in central police station ) करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

ठाण्यात गुंडांचा हैदोस

तलवारीचा धाक दाखवून लुटमार -काही दिवसापूर्वीच गावगुंडांच्या टोळक्याने तलवारीचा धाक दाखवून लुटमारीसह वाहनांची तोडफोड केली ( Vandalized vehicles ) होती. अशीच घटना पुन्हा उल्हासनगर कॅम्प नंबर तीन च्या सुभाष नगर परिसरात घडली असून दहा ते बारा गाड्यांची त्यांनी तोडफोड केलीय. यावेळी या गावगुंडांनी स्थानिक नागरिकांना बेदम मारहाण करीत त्यांच्या कडील मोबाईल आणि रोख रकमेची लुटमार केली. परिसरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने या गावगुंडांनी हा हैदोस घातल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या घटनेनंतर स्थानिक नागरिक प्रचंड दहशतीखाली असून या गावगुंडांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांच्याकडून केली जातीय.

गुंडांच्या विरोधात गुन्हा दाखल -उल्हासनगर शहरात दिवसागणिक या गावगुंडांची दादागिरी वाढत चाललेली आहे. पोलिसांनी यापूर्वी अनेक गावगुंडांना स्थानबद्ध केले असून एमपीडीए कायद्याअंतर्गत विविध कारागृहात रवानगी केली आहे.असे असताना देखील शहरात नवनवीन गुंड तयार होऊन अशाप्रकारे नागरिकांना त्रास देण्याचा काम करत आहेत. सध्या मध्यवर्ती पोलिसांकडून या गुंडांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा -Deepali Syed Statement : वाद आणि मान-अपमान बाजूला ठेवून शिंदे व ठाकरेंनी एकत्र यावे- दिपाली सय्यद

ABOUT THE AUTHOR

...view details