ठाणे - टिटवाळा नजीक बल्याणी परिसरातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन मुलं मैदानात खेळत असताना भरधाव टेम्पो चालकाने १४ महिन्यांच्या मुलाला चिरडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करून टोम्पो चालकाला अटक करण्यात आली आहे. सैफ फारुखी असे टेम्पो चालकाचे नाव आहे. तर, अरसलाम शहा असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. (Tempo Crushes Little boy) या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू - टिटवाळा नजीक बल्याणी परिसरात असलेल्या रहीसा चाळजवळ एका मार्बल दुकानात (२४ मार्च)रोजी सकाळच्या सुमारास एका टेम्पो मारबल घेऊन आला होता. त्यानंतर टेम्पो बाहेर पडताना परिसरातील तीन मुलं खेळत होती. त्यावेळी खेळणाऱ्या १४ महिन्याच्या मुलाला चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेत या त्या मुलाचा उपचारादरम्यान त्याच दिवशी दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २४ मार्च रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली आहे.