ठाणे- चिंचपाडा परिसरातील नागरिकांसाठी एमएमआरडीएने सुसज्ज शौचालय बांधून दिले होते. मात्र अंबरनाथ नगरपरिषदेने हे शौचालय तोडले. त्यामुळे शौचालय तोडल्याच्या निषेधार्थ स्वाभिमान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकार्यांना टमरेल भेट देत आंदोलन केले. या आंदोलनावेळी नगरपरिषदेच्या सुरक्षा रक्षकाची आणि आंदोलनकर्त्यांची बाचाबाची झाली.
नगरपालिकेने तोडले शौचालय, स्वाभिमान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले 'टमरेल' भेट - Officer
एमएमआरडीएने नागरिकांसाठी सुसज्ज शौचालय बांधून दिले होते. मात्र अंबरनाथ नगरपरिषदेने हे शौचालय तोडले. त्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
अंबरनाथ पश्चिमेला चिंचपाडा भागातील एमएमआरडीएच्या निधीतून सुजस्य व चांगल्या स्थितीत शौचालय होते. मात्र नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी हे शौचालय तोडल्याने संताप व्यक्त करण्यात आला. त्याच्या निषेधार्थ नागरिकांनी हे आंदोलन करण्यात आले. सात वर्षांपूर्वी एमएमआरडीएने तब्बल 35 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी शौचालयांची उभारणी केली होती. मात्र, अंबरनाथ नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाने परिसरातील नागरिकांना कुठलीही सूचना न देता, हे शौचालय तोडले.
या जागेवर समाज मंदीर बांधण्याचा घाट नगरपालिकेने घातला आहे. त्यामुळे या परिसरातील ज्या नागरिकांच्या घरात शौचालय नाहीत, त्यांना नैसर्गिक विधीसाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. विशेष म्हणजे नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी या नागरिकांचा विचार न करता हे शौचालय तोडले. त्यामुळे अंबरनाथ स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष विकास सोमेश्वर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकाऱ्यांना टमरेल भेट देत आंदोलन केले.