महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ठाणे : चोरीच्या संशयावरून जमावाकडून रॉडसह दांडक्याने मारहाण, हल्ल्यात तरुणाचा मृत्यू

जमावाने चोर असल्याच्या संशयावरून लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने तरुणावर हल्ला केला. या हल्ल्यात रमेश याचा मृत्यू झाला. न्यायालयाकडून नऊ जणांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

By

Published : Oct 12, 2021, 5:29 AM IST

Updated : Oct 12, 2021, 8:18 AM IST

नारपोली पोलीस ठाणे
नारपोली पोलीस ठाणे

ठाणे - चोरीच्या संशयावरून जमावाने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात जमावातील नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व आरोपींना नारपोली पोलिसांनी अटक केली आहे. रमेश मुरली शर्मा ( वय २५ रा. चरीगावा, उत्तर प्रदेश ) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मृत रमेश शर्मा हा मूळचा उत्तरप्रदेश चरीगावाचा रहिवाशी आहे. त्याचे वडील मुरली हे ठाण्यात राहतात. रविवारी रात्रीच्या सुमारास नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मुनीसुरत कंपाउंड येथील भंगार दुकानात मध्यरात्री दीडच्या सुमारास रमेश शर्मा आला. याठिकाणी असलेल्या जमावाने चोर असल्याच्या संशयावरून लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात रमेश याचा मृत्यू झाला. मृत रमेशचे वडील मुरली रामप्रसाद शर्मा ( वय ४५ रा . वागले इस्टेट ठाणे ) यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हेही वाचा-प्रेम संबंधाच्या संशयातून पतीची हत्या; पत्नीला अटक तर साथीदार फरार

आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून नारपोली पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवत आरोपींचा शोध घेतला. पोलिसांनी काही तासातच आरोपी शिवपूजन भगवानदास गुप्ता ( वय ३० ) पिंटू पंचगुलाम गुप्ता ( वय २२ ) , पंचगुलाम जोकूराम गुप्ता ( ४४ ) शिवकुमार मुरली वर्मा ( ३२ ) पवनकुमार रामसहाय मिश्रा ( २७ ) देवीप्रसाद टिळकराम वर्मा ( ३० ) बाबुलाल शिवप्रसाद गौतम ( २० ) जगदीश रामनरेश गौतम ( २१ ) रामभरोस रामकुशनु निशाद ( २८ ) अशा नऊ जणांना अटक केली. त्यांना सोमवारी न्यायालयात हजार केले. न्यायालयाकडून तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास नारपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत करीत आहेत.

हेही वाचा-भिवंडीत तीन गोदामांतून 'हुक्का' फ्लेवरचा 9 कोटी रुपयांचा साठा जप्त

Last Updated : Oct 12, 2021, 8:18 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details