ठाणे -ठाण्याच्या पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेले ठाणे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh case) यांचा सहकारी असलेला आरोपी मर्चंट याच्या जमीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. दरम्यान विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी मात्र परमबीर सिंग यांच्याबाबत पोलीस हलगर्जीपणा करीत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. गुन्हा दाखल होऊन ६० दिवस झाल्यानंतरही पोलिसांनी अद्याप चार्जशीट दाखल केली नाही. त्यामुळे, आरोपीला जामीन मिळण्यास मदत होत असल्याचा संशय विशेष सरकारी वकील घरत यांनी व्यक्त केला.
हेही वाचा -हत्येचा धक्कादायक उलगडा; दाराच्या फटीतून सबंध बघतो म्हणून केली रिक्षाचालकाची हत्या
ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्यात ठाणे आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह आठ पोलीस अधिकारी आणि अन्य आरोपींचा समावेश आहे. परमबीर सिंग हे परागंदा आहेत. तर, या गुन्ह्यातील आरोपी तारिक परवीन मर्चंट याचे न्यायालयात दोन जामीन अर्ज आहेत. त्यातील एक पेंडीग आहे, तर दुसरा अर्ज हा पोलिसांनी चार्जशीट दाखल केली नसल्याने १६२ प्रमाणे आहे. त्यावर आता बुधवारी सुनावणी होणार आहे. पोलिसांनी चार्जशीट सादर न केल्याने न्यायालयात युक्तिवाद काय करणार? हा प्रश्न असल्याचे घरात यांनी सांगितले. त्यामुळे, आरोपीला जामीन मंजूर होण्याची शक्यता निर्माण होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा बाऊ
सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना दिलेल्या दिलाशाबाबत बाऊ करण्यात येत आहे. न्यायलयाने परमबीर सिंग यांना ६ डिसेंबर पर्यंत अटक करू नये, असा दिलासा दिला आहे. पण, पोलीस त्यांना अटक करू शकतात. कारण त्यांच्या अर्जावर सुनावणी झालेली नाही. तेवढा अधिकार पोलिसांना आहे. आता न्यायालयाने आदेश दिल्याप्रमाणे ६ डिसेंबर पर्यंत परमबीर सिंग यांना न्यायालयात हजर राहणे क्रमप्राप्त आहे.