महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Unauthorized schools : ठाणे ग्रामीण भागात आढळल्या ३८ प्राथमिक शाळा अनधिकृत - शिक्षणाधिकाऱ्यांचे आवाहन

ठाणे ग्रामीण भागात 38 अनधिकृत शाळा (Unauthorized school in Thane) आढळल्या आहेत. याची नोंद जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाने दिली असून, त्याची यादी विभागाने जाहीर केली असून, त्यांना या शाळा बंद करण्यासंबंधी आदेश पाठवले (Unauthorized school closure orders) आहेत. तसेच शिक्षणाधिकाऱ्यांनी पालकांना आवाहन केले आहे की, आपल्या पाल्यांचा प्रवेश अनधिकृत शाळेत करू नये. (Not Take Admission)

Unauthorized schools
अनधिकृत शाळा

By

Published : May 31, 2022, 1:49 PM IST

ठाणे : ठाणे ग्रामीण भागात 38 अनधिकृत शाळा आढळून आल्या आहेत. जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील ३८ अनधिकृत शाळांची यादीजाहीर केली आहे. संबंधित संस्था चालकांनी त्यांचे संस्थेमार्फत सुरू असलेल्या अनधिकृत प्राथमिक शाळा/वर्ग तत्काळ बंद करूनतसे हमीपत्र प्राथमिक शिक्षण विभागास सादर करण्याचे आदेश ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी दिले आहेत. त्याचबरोबर अनधिकृत शाळेमध्ये (Unauthorized school) पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये, असे आवाहनही डॉ. कारेकर यांनी केले आहे.

अनधिकृत शाळांना नोटीस : जिल्हातील मुरबाड, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, शहापूर आदी ग्रामीण तालुक्यात एकूण ३८ प्राथमिक शाळा अनधिकृत आहेत. या शाळांच्या संस्था चालकांनी अनधिकृत शाळा/वर्ग तत्काळ बंद न केल्यास संबंधित संस्था चालकांविरुद्ध बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलम १८(५) व १९ (१) मधील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.


अनधिकृत संपूर्ण शाळांची यादी 1. : अंबरनाथ तालुक्यातील गोकुळ कॉन्व्हेंट स्कूल, रेन्बो इंग्लिश स्कूल, खरड, श्री समर्थ स्कूल नेवाळी, रुद्रा इंग्लिश मीडियम स्कूल वांगणी (प.), प्रगती विद्या मंदिर पार्ले, सनशाईन इंग्लिश स्कूल उमरोली, मुरबाड तालुक्यातील ऑक्सफोर्ट पब्लिक स्कूल, भिवंडी तालुक्यातील एम. एन. तरे इंग्लिश मीडियम स्कूल धामणगाव, इंग्लिश मीडियम स्कूल कुंदेफाटा, नॅशनल इंग्लिश स्कूल दापोडे, लिओ इंटरनॅशनल स्कूल काल्हेर, लिओ हायस्कूल काल्हेर, वेदिका इंग्लिश मीडियम स्कूल काल्हेर,

अनधिकृत शाळांची यादी 2. : द विनर्स इंग्लिश मीडियम स्कूल कांबे, अवेंचुरा नॅशनल स्कूल कोन, खान सदरुद्दिन प्रायमरी स्कूल कारीवली, अग्नीमाता इंग्लिश स्कूल पिंपळास, व्ही.पी.इंग्लिश स्कूल पिपंळास, समर्थ विद्यालय तलाई पाडा पिंपळनेर, ईडू स्मार्ट इंग्लिश स्कूल सावरोली, इकरा नॅशनल स्कूल पडघे, कल्याण तालुक्यातील बी.आर.डी. स्कूल घोटसई, युनिक इंग्लिश मिडीयम स्कूल टिटवाळा, केंन्ट ग्लोबल पब्लिक स्कूल गुरवली, राया इंग्लिश स्कूल, राया, नवज्योती बेथनी विद्यापिठ रुंदे,

अनधिकृत शाळांची यादी 3. : प्रकाश किड्स स्कूल खडवली (पूर्व.), जी.के.इंग्लिश हायस्कूल खडवली (पुर्व.), सावित्रीबाई फुले इंग्लिश प्रायमरी स्कूल म्हारळ, सावित्रीबाई फुले इंग्लिश प्रायमरी स्कूल म्हारळ, विवेकानंद इंग्लिश हायस्कूल, निलम इंग्लिश स्कूल नांदीवली, आदर्श विद्यालय लोढा हेवन निळजे, डीन्गेटी कॉन्व्हेंट स्कूल कोळेगांव, सरस्वती इंग्लिश स्कूल दहिसर, आयडीएल इंग्लिश स्कूल पिंपरी, शहापूर तालुक्यातील एम.आर.राणे प्राथमिक शाळा आसनगांव, शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल शेरे, एम.जे.वर्ल्ड स्कूल आदी शाळा या अनधिकृत शाळा म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.


हेही वाचा :मुंबईत तब्बल २६९ अनधिकृत शाळा गेल्या १० वर्षांपासून सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details