नवी मुंबई -पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री ही बदली करण्यात आली. गणेश देशमुख यांच्या जागी उल्हासनगरचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गणेश देशमुख यांची ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पनवेलचे आयुक्त गणेश देशमुख यांची तडकाफडकी बदली; सुधाकर देशमुख नवे आयुक्त - गणेश देशमुख ठाणे महापालिकेत
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची पनवेलच्या महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
![पनवेलचे आयुक्त गणेश देशमुख यांची तडकाफडकी बदली; सुधाकर देशमुख नवे आयुक्त Ganesh Deshmukh](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7273089-987-7273089-1589962378801.jpg)
गणेश देशमुख
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या आठवड्यात मुंबई महापालिकेत मोठे फेरबदल करण्यात आले होते. मुंबई परिसरातील अन्य महापालिकेत सुद्धा कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून त्यांचा ठपका संबंधित महापालिका आयुक्तांवर ठेवला जात असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेचे सुधाकर देशमुख यांची आता पनवेल महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.