ठाणे -असा दिवस कधी पाहिला नाही ना कधी अनुभवला देखील नाही. युद्धजन्य परिस्थितीत नितिष कुमारचे हे शब्द आहेत जे काळजाला लागून जातात. (Bomb blast in Kharkiv city) नितिष कुमार हा शिक्षण घेण्यासाठी खार्कीव्ह शहरामध्ये गेला असताना युद्धजन्य परिस्थितीत या शहरातून परतण्यासाठी अनेक पर्याय आणि अनेक मार्ग अवलंबत होता. परंतु, हे सर्व मार्ग ठप्प झाले असल्याने नितीश कुमारला आपल्या मायदेशी परत येण्यासाठी मोठे कष्ट करावे लागत आहेत. त्यात शेकडो विद्यार्थ्यांना आज तिथल्या मेट्रो स्थानकात स्थानिकांकडून मारहाणही झाली आहे.
रेल्वेमध्ये फक्त युक्रेन नागरिकांनाच प्रवेश देण्यात येत आहे
आजच भारतीय दूतावासाने खार्कीव्ह शहरातील विद्यार्थ्यांना शहर सोडण्याचे आदेश दिल्यानंतर जवळपास चारशे भारतीय विद्यार्थी हे खाजगी वाहनाने आणि पायी चालत तेथील शहरातून जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. (Bomb blast in Kharkiv) सकाळीच ते सर्व विद्यार्थी खार्कीव्ह येथील रेल्वे स्थानकावर गेल्यानंतर रेल्वेची प्रतीक्षा होती. परंतु रेल्वे आल्यानंतर देखील तेथे भारतीय विद्यार्थ्यांवर अन्याय झाला. रेल्वेमध्ये फक्त युक्रेन नागरिकांनाच प्रवेश देण्यात येत आहे. त्यामुळे जो मार्ग मिळेल त्या मार्गाने खार्कीव्ह सोडण्यासाठी या विद्यार्थ्यांची धडपड सुरू आहे.
मित्रांना या सर्व परिस्थितीचा खूप मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे