महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 1, 2022, 8:02 PM IST

ETV Bharat / city

वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नांना यश, ठाण्यात 31 डिसेंबरला एकही अपघात नाही

ठाणे आयुक्तालय क्षेत्रात एकूण 36 पोलीस पथके तयार करून 54 मोक्याच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. वाहतूक पोलिसांनी सतत आवाहन करून वाहनचालकांमध्ये जनजागृती केली जेणेकरून नागरिकांनी घरीच राहून नवीन वर्षाचे स्वागत करणे पसंत केले.

no accident Thane on 31 December
ठाणे वाहतूक पोलीस नव वर्ष बंदोबस्त

ठाणे -नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडतात व अनेकदा दारूच्या नशेत गाडी चालविल्याने त्यांचा अपघात होतो. यात अनेक लोकं आपला जीव गमावतात. त्याला आळा बसावा म्हणून ठाणे वाहतूक शाखेने जय्यत तयारी केली होती. त्यामुळे, ठाण्यात 31 डिसेंबरला एकही अपघात झाला नाही.

माहिती देताना पोलीस अधिकारी

ठाणे आयुक्तालय क्षेत्रात एकूण 36 पोलीस पथके तयार करून 54 मोक्याच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. वाहतूक पोलिसांनी सतत आवाहन करून वाहनचालकांमध्ये जनजागृती केली जेणेकरून नागरिकांनी घरीच राहून नवीन वर्षाचे स्वागत करणे पसंत केले.

हेही वाचा -Navi Mumbai Crime : नवी मुंबई पोलिसांनी पकडले अडीच कोटीचे अमली पदार्थ

दरवर्षीच्या मानाने यावर्षी रस्त्यावर कमी प्रमाणात वाहने दिसत होती. गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कोरोनाचे संकट असल्याने अनेकांनी होटेल आणि इतर बुकिंग रद्द करून घरी राहण्याचे ठरविले. त्यामुळे कमी प्रमाणात चलान निघाले. काल रात्री एकूण 297 वाहनचालकांवर ड्रिंक अँड ड्राइव्ह संबंधित मोटरवाहन कायदा 185 अंतर्गत कारवाई करण्यात आली. तर, 131 जणांना दारू पिलेलेल्या व्यक्तीच्या गाडीत बसल्याने दंडित करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली. यावर्षी कारवाई करण्यात आलेल्या वाहचालकांची संख्या मागच्या काही वर्षांपेक्षा कमी असल्याने आपल्या विभागाने घेतलेल्या मेहनतीला यश आल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

दंडाची रक्कम वाढल्याचा परिणाम

दारू पिऊन गाडी चालवण्याचा दंड हा दहा हजार रुपयांपर्यंत केल्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांनी घरी राहूनच नवीन वर्षाचे स्वागत केले. दंडाची रक्कम ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला भगदाड पडत असल्याचे चित्र काल ठाण्यात पाहायला मिळाल.

हेही वाचा -Dispute in Shivsena and NCP Corporators : राज्यात सत्तेत एकत्र असलेले ठाण्यात शिवसेना अन् राष्ट्रवादीचे नगरसेवक भिडले

ABOUT THE AUTHOR

...view details