ठाणे - शहापूर तालुक्यातील जंगली बाबा आश्रम शाळेत गोळीबाराचे प्रशिक्षण ( Shooting Training ) सुरू होते. यावेळी एका ७ व्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला गोळी लागून गंभीर जखमी झाल्याची घटना ( student was shot during the shooting training ) घडली आहे. आज दुपारच्या सुमारास घडली आहे. कांचन राया कोरडे असे गोळीबारात जखमी झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. तर गंभीर जखमी अवस्थेत विद्यार्थिनीला शहापूर मधील उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले आहे.
Shooting Training : जंगली बाबा आश्रम शाळेतील गोळीबाराच्या प्रशिक्षणावेळी विद्यार्थिनीला लागली गोळी; गंभीर जखमी - student was shot during the shooting training
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील जंगली बाबा आश्रम शाळेत गोळीबाराचे प्रशिक्षण ( Shooting Training ) सुरू होते. यावेळी एका ७ व्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला गोळी लागून गंभीर जखमी झाल्याची घटना ( student was shot during the shooting training ) घडली आहे. आज (शनिवार) दुपारच्या सुमारास घडली आहे.
Shooting Training thane
प्रशिक्षण कॅम्प बेकायदेशीर? - खळबळजनक बाब म्हणजे स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराचे प्रशिक्षण कॅम्प बेकायदेशीर असल्याचे सांगण्यात आले. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल होऊन पंचनामा करत आहेत. सायंकाळपर्यंत संबधीतांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे श्रमजीवी संघटना कार्यकर्ताही घटनास्थळी उपस्थित आहेत. यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण असल्याचे दिसून आले आहे.
Last Updated : Jun 4, 2022, 6:30 PM IST