महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 4, 2022, 7:21 PM IST

ETV Bharat / city

Students Tested Positive : कोरोनाबाधित विद्यार्थ्यांना घेऊन पालकांनी काढला पळ; चिंबीपाडा आश्रमशाळेतील प्रकार

चिंबीपाडा आश्रमशाळेतील ( Chimbipada Ashram School ) काही मुलांची कोरोना चाचणी बाकी असताना पालकांनी गोंधळ घातला. शिवाय कोरोनाची लागण झालेल्या विद्यार्थ्यांसह तपासणी न ( Student Tested Positive Chimbipada ) झालेले अशा सर्वच विद्यार्थ्यांना घेऊन पालकांनी घराकडे पळ काढण्याची धक्कादायक घटना घडली आहे.

चिंबीपाडा आश्रमशाळा भिवंडी
चिंबीपाडा आश्रमशाळा भिवंडी

ठाणे - भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा आश्रमशाळेतील ( Chimbipada Ashram School ) काही मुलांची कोरोना चाचणी बाकी असताना पालकांनी गोंधळ घातला. शिवाय कोरोनाची लागण झालेल्या विद्यार्थ्यांसह तपासणी न ( Student Tested Positive Chimbipada ) झालेले अशा सर्वच विद्यार्थ्यांना घेऊन पालकांनी घराकडे पळ काढण्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र या घटनेमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून आता त्या कोरोनाबाधित विद्यार्थ्यांचा शोध सुरु केला आहे.

कोरोनाबाधित विद्यार्थ्यांना घेऊन पालकांनी काढला पळ

देश तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असतानाच ओमीक्रॉन या नव्या विषाणूने प्रवेश करणे सुरूवात केले आहे. भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा येथील शासकीय आश्रमशाळेतील वस्तीगृहात राहणाऱ्या काही विद्यार्थ्यांना सर्दी आणि खोकला जाणवू लागला. त्यामुळे मुख्याध्यापक आर.एन चौधरी यांनी नजीकच्या चिंबीपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात विद्यार्थ्यांची तपासणी केली. त्यात 14 मुली 4 मुलांसह अधीक्षक व स्वयंपाकी अशा एकूण 20 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर खबरदारी म्हणून आश्रमशाळा, वस्तीगृह व शाळेतील विद्यार्थ्यांची अँटीजेन चाचणी घेण्यास सुरवात केली. विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी परिसरात पसरली. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी आश्रमशाळेत एकत्रित होऊन गोंधळ घातला. तसेच चाचणी करण्यास व बाधित विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्यास मज्जाव करण्यास सुरुवात केली.

आश्रमशाळेत एकूण 602 विद्यार्थ्यांपैकी 470 विद्यार्थी हजर होते. त्यापैकी 187 विद्यार्थी वस्तीगृहात 140 विद्यार्थी हजर होते. व्यवस्थापनाने काही मुलांची तपासणी केली असता त्यामध्ये 22 मुली, 6 मुले व 2 कर्मचारी असे एकूण 30 जणांना लागण झालेले आढळून आले. या घटनेनंतर आरोग्य यंत्रणा, आदिवासी प्रकल्प विभाग, पोलीस व महसूल प्रशासन घरी निघून गेलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेत आहे. आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून गृह विलगिकरण अथवा रुग्णालयात दाखल करण्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आर एन चौधरी यांनी दिली आहे. तर तालुका आरोग्य विभाग, पंचायत समिती प्रशासनाला सायंकाळपर्यंत या घटनेची माहितीच नव्हती. त्यामुळे फक्त रुग्णवाहिका आणून ठेवल्याने आदिवासी पालक भयभीत झाले. त्यांनी आपल्या पालकांना घेऊन पळ काढल्याने सर्वच यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details