ठाणे - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पारित केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी मुंब्र्यामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. मुंब्रा भागातील अल्पसंख्याक समाजाच्या जनतेने हे ठिय्या आंदोलन केले.
मुंब्रामध्ये CAA आणि NRC विरोधात ठिय्या आंदोलन हेही वाचा... '...तब मेरा बाप फाँसी के तक्त को चुम के, इनक्लाब झिंदाबाद के नारे लगा रहा था'
भारतात केंद्र सरकारने पारित केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीला अनेक ठिकाणी जोरदार विरोध होताना पहायला मिळत आहे. सीएए कायदा संमत झाल्यापासूनच देशभरात ठिकठिकाणी या कायद्याला विरोध होत आहे. अनेक ठिकाणी यासाठी निदर्शने सुरू आहेत. मुंब्र्यातही CAA आणि NRC च्या विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा... दिल्ली विधानसभा निवडणूक: अरविंद केजरीवालांविरोधात काँग्रेसकडून या नावाची घोषणा...
'भारतीय संविधानाच्या विरोधात आणि जातीधर्मात तेढ निर्माण करणारा हा कायदा आहे. तसेच हा कायदा लोकशाहीचा गळा घोटणारा' असल्याचा आरोप आंदोलक नागरिकांनी केला आहे. ठिय्या आंदोलनाच्या वेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.