महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'त्याला' कडक शिक्षा करा, पण निष्पाप कुटुंबाचा विचार करा; पत्नीची याचना - Attack on Assistant Commissioner Kalpita Pimple

सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ला ही चूकच आहे. तेव्हा अमरजीत यादव यांच्यावर कडक कारवाई करा, पण वस्तुस्थिती समजून घ्या आणि त्याच्यामागे असलेल्या परिवाराचा निष्पाप मुलांचा विचार करा, अशी विनंती अटकेतील आरोपी अमरजीत यादव याची पत्नी बिंदू यादव यांनी व्यक्त केली आहे.

बिंदू यादव (अमरजीत यादव याच्या पत्नी)
बिंदू यादव (अमरजीत यादव याच्या पत्नी)

By

Published : Sep 1, 2021, 10:55 PM IST

ठाणे - कारवाई करण्यासाठी आलेल्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ला ही चूकच आहे. तेव्हा अमरजीत यादव यांच्यावर कडक कारवाई करा, पण वस्तुस्थिती समजून घ्या आणि त्याच्यामागे असलेल्या परिवाराचा निष्पाप मुलांचा विचार करा, अशी विनंती अटकेतील आरोपी अमरजीत यादव याची पत्नी बिंदू यादव यांनी व्यक्त केली आहे. कुणीही माणूस थेट हल्ला करणार नाही, तेव्हा सत्य पडताळून बघा एवढीच विनंती असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली केली.

'त्याला' कडक शिक्षा करा, पण निष्पाप कुटुंबाचा विचार करा; पत्नीची याचना

आझादनगर येथे भाड्याने राहतो

सोमवारी कासारवडवली नाका येथे घडलेला थरार हा निंदनीय होता. या प्रकरणी अटकेतील आरोपी अमरजीत यादव हा गेल्या १५ वर्षांपासून ठाण्याच्या ब्रह्मांड परिसरात कुटुंबासह राहत होता. कोरोनानंतर बिघडलेल्या परिस्थितीमुळे तो आझादनगर येथे भाड्याने पत्नी बिंदू, भाजी विक्रेता मुलगा दिपू आणि मुलगी दीपा यांच्यासोबत राहत होता. त्याचा आणखीन एक मुलगा दीपक हा मूळगावी राहत आहे. कोव्हिडच्या काळात धंदा बंद उपासमार आणि कर्जबाजारी झाल्याने मोकळीक मिळताच पुन्हा धंदा सुरु झाला.

'रागात हल्ला झाला'

घटनेच्या दिवशी घटनास्थळी नेमके काय घडले. याबाबत घटनास्थळीच उपस्थित असलेल्या आरोपी यादव याच्या मुलाने दिलेल्या माहितीत तो हल्ला सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर नव्हता. तो चुकीने झाला. तो हल्ला रागाच्या भरात सुरक्षा रक्षक याच्यावर होता. धावपळीत चुकीने महिला अधिकारी यांच्यावर हल्ला झाला. जेव्हा पालिका पथक महिला अधिकारी यांच्यासोबत घटनास्थळी आले. यादव हा घटनास्थळी उभा होता. त्यावेळी पालिका सुरक्षा रक्षक याने आरोपी अमरजीत यादव याला ढकलले आणि यादव एका स्कुटीवरून खाली जोरदार आपटला . त्यामुळे संतप्त झालेल्या आमर्जीत यादव याने जवळच असलेला चाकू घेऊन सुरक्षा रक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर हल्ला केला. मात्र, सहाय्यक आयुक्त पिंपळे यामध्ये आल्याने त्यांच्या हातावर वार झाला.

'सुरक्षा रक्षक पालवे यांच्यावर तो हल्ला होता'

महिला अधिकारी यांच्यावर वार झाल्यानंतर अमरजित यादव यांच्यावर धावून आलेल्या सुरक्षा रक्षक पालवे यांच्यावर मग जाणीवपूर्वक रागाने यादव याने हल्ला केला. त्यात त्यांचे एक बोट कापले गेले. संतप्त यादव यांचा मुलगा दिपू याने वडिलांच्या हातातील चाकू काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याच्या हातालाही इजा झाली असल्याची कबुली भाजी विक्रेता आणि आरोपीचा मुलगा दिपू यादव याने दिली. तो हल्ला कारवाईच्या द्वेषापोटी नाही. तर, सुरक्षारक्षक याने ढकलून खाली पडल्याने रागाच्या भरात केलेला हल्ला आहे. ही वस्तुस्थिती असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिपू यादव यांनी सांगितले.

आरोपीचे टोपण नाव " बिहारी "

अनेक वर्षांपासून ठाण्यात वास्तव्य करणाऱ्या बिहारी बाबू उर्फ अमर्जीत यादव याच्या कुटुंबावर कोव्हीड काळात उपासमारीची वेळ आली. तीन महिन्यापूर्वीच कर्जबाजारी झाल्याने आरोपी अमरीश यादव याने ब्रह्माण्ड येथील गुजराती चाळीतून स्थलांतर करीत आझादनगर येथे भाड्याने घर घेऊन कुटुंबासह राहत होता. फेरीवाले आरोपी अमर्जीत यादव याला बिहारी म्हुणून ओळखत होते. बाप-लेक दोघेही फेरीवाल्याचा धंदा करीत होते. तर, मुलगा दिपू हा भाजी विक्रीचा धंदा लावीत होता अशी माहिती स्थानिकांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details