ठाणे- जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे हुक्का पार्लर सुरू आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निकोटीनयुक्त हुक्का फ्लेवर वापरले जात असल्याने युवा पिढी नशेच्या आहारी जात आहे. त्यातच भिवंडीत गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत महाराष्ट्रात प्रतिबंधित निकोटीनयुक्त 'अफजल' व 'सोएक्स हर्बल' या हुक्का फ्लेवरचा साठा जप्त केला आहे. या साठ्याची किंमत तब्बल 9 कोटी 36 लाख 78 हजार 520 रुपये आहे.
अल्ताफ अत्तरवालामुळे कोटींचे हुक्याचे घबाड हाती
गुन्हे शाखा भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार 6 ऑक्टोबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नारपोली पोलीस ठाणे हद्दीतील धामणकर नाका येथील 'अल्ताफ अत्तरवाला' या दुकानावर छापा टाकण्यात आला. या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेले 8940 रुपयांचे हुक्क्याचे वेगवेगळ्या प्रकारचे 57 हुक्का फ्लेवर आढळून आले. या संदर्भात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास करताना वरिष्ठांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करण्याचे निर्दश दिले होते.
तीन गोदामांतून 'हुक्का' फ्लेवरचा 9 कोटी रुपयांचा साठा जप्त हेही वाचा-चांदणी डान्स बारवर गुन्हे अन्वेषण विभागाकडून छापा; १७ बारबालांसह ४० जण ताब्यात
तीन गोदामांवर छापेमारी
भिवंडी शहर परिसरामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधीत असलेल्या हुक्क्याच्या साठ्याचा शोध घेताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दापोडा ग्रामपंचायत हद्दीतील हरीहर कॉम्प्लेक्स या गोदाम संकुलातील, हायस्ट्रीट इम्पेक्स लि. मुंबई या कंपनीच्या तीन गोदामांवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र जाधव, पोलीस उपनिरीक्षक शरद बरकडे, पोलीस कर्मचारी अनिल पाटील, सुधाकर चौधरी, राजेंद्र चौधरी, देवानंद पाटील, श्रीधर हुडेकरी, रंगनाथ पाटील, प्रमोद धाडवे, सचिन जाधव,साबीर शेख, किशोर थोरात, वसंत गवारे, सचिन सोनावणे, भावेश घरत या पथकाने सहभाग घेतला. या छाप्यात गोदामात निकोटीनयुक्त अफजल हुक्का फ्लेवरचे 2 हजार 862 बॉक्स आढळले. त्याची किंमत 8 कोटी 42 लाख 49 हजार 610 रुपये आहे. 'सोएक्स हर्बल फ्लेवर' चे 375 बॉक्स आढळले. त्याची किंमत 94 लाख 28 हजार 910 रुपये आहे. छाप्यात एकूण 9 कोटी 36 लाख 78 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात भिवंडी गुन्हे शाखेला यश मिळाले आहे.
हेही वाचा-पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून मानलेल्या मुलावर जीवघेणा हल्ला; पतीला गुजरातच्या सीमेवरून जेरबंद
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विक्री केला जात होता हुक्का
सदरचा 'अफजल हुक्का फ्लेवर' आणि 'सोएक्स हर्बल हुक्का फ्लेवर' हे दोन्ही हुक्का फ्लेवरचा माल 'सोएक्स इंडीया प्रा. लि. नरीमन पॉईट, मुंबई या कंपनी कडुन उत्पादीत व निर्यात केला जात असुन सदर उत्पादन केलेला हुक्का फ्लेवरचा माल या तीन गोडावून मधुन बेकायदेशिरपणे विकी केला जात आहे. सदर सोएक्स इंडीया प्रा. लि. या कंपनीकडुन बनविलेला निकोटीनयुक्त 'अफजल हुक्का फ्लेवर' हा माल भिवंडी शहर परिसरासह ठाणे मुंबई यासह महाराष्ट्र राज्यामध्ये इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विक्री होत असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी स्पष्ट केले आहे .
हेही वाचा-प्रेमास नकार दिल्याने प्रेयसीला व्हिडिओ कॉल करत तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न