महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Stepson Killing Thane: बिछान्यात लघुशंका केल्याच्या रागातून सावत्र आईने केला साडेतीन वर्षाच्या मुलाचा खून - Stepson Killing Thane

साडेतीन वर्षाचा अल्पवयीन मुलगा बिछान्यात लघुशंका करीत असल्याच्या रागातून सावत्र आईने जीवघेणी मारहाण beat up step son करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेकडील पाथर्ली गावातील गायकवाडी येथील एका इमारतीत घडली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात आईवर खुनाचा गुन्हा दाखल murder case against step mother करून पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या step mother arrested for murdering step son आहे. अंतीमादेवी संजय जैयस्वाल वय २८ असे अटक करण्यात आलेल्या सावत्र आईचे नाव आहे. तर कार्तिक असे खून झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे.

Stepson Killing Thane
Stepson Killing Thane

By

Published : Sep 30, 2022, 7:12 PM IST

ठाणे: साडेतीन वर्षाचा अल्पवयीन मुलगा बिछान्यात लघुशंका करीत असल्याच्या रागातून सावत्र आईने जीवघेणी मारहाण beat up step son करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेकडील पाथर्ली गावातील गायकवाडी येथील एका इमारतीत घडली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात आईवर खुनाचा गुन्हा दाखल murder case against step mother करून पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या step mother arrested for murdering step son आहे. अंतीमादेवी संजय जैयस्वाल वय २८ असे अटक करण्यात आलेल्या सावत्र आईचे नाव आहे. तर कार्तिक असे खून झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे.

क्षुल्लक कारणावरून सावत्र मुलाची हत्या करणाऱ्या सावत्र आईला अटक


वायरच्या साहाय्याने बेशुद्ध होईपर्यत चिमुकल्याला मारहाण :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आई ही दुसऱ्या पतीसोबत तीन मुलासह डोंबिवली पूर्वेकडील पाथर्ली गावातील गायकवाडी येथील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहते. पहिल्या पत्नीचे निधन झाल्याने संजय यांनी मुलाचा सांभाळ करण्यासाठी आरोपी महिलेशी दुसरा विवाह केला होता. संजय यांना पहिल्या पत्नीपासून ३ मुले असून यामधील एक मुलगा गावी राहतो. तर आरोपी अंतीमादेवी लाही पहिल्या पतीपासून १ मुलगा आहे. त्यामुळे स्वतःच्या मुलासह दोन सावत्र मुलाचा सांभाळ आरोपी आई करत होती. खळबळजनक बाब म्हणजे, आरोपी आई नेहमीच कार्तिकला मारहाण करीत होती. त्यातच २८ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास मृत कार्तिकने बिछान्यात लघुशंका केली होती. याच गोष्टीचा राग येऊन सावत्र आईने त्याला वायरच्या साहाय्याने बेशुद्ध होईपर्यत घरातच बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या वडिलांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला ठाण्यातील कळवा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला.

आरोपी सावत्र आईला घेऊन जाताना महिला पोलीस

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल:सुरवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर मृतदेहाच्या शवविच्छदेन अहवालात त्याचा मृत्यू जबर मारहाण केल्याने झाल्याचे नमूद करण्यात आल्याने टिळकनगर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक बाबाबासाहेब बाकले यांच्या फियादीवरून सावत्र आई अंतीमादेवी खुनाचा दाखल करून आज तिला अटक केली आहे. आज आरोपी आईला न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सरडे करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details