ठाणे पत्नीच्या चारित्र्यावर संशय suspicion on wife character घेत पतीने कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवरुन Kalyan Western railway skywalk murder जात असताना पत्नीवर अचानक चाकूने सपासप वार करून knife attack on wife पत्नीला रक्ताच्या थोराळ्यात लोळविल्याची wife murder attempt in thane घटना घडली आहे. तर हल्लेखोर पती पळून जाण्याचा प्रयत्न करताच assailant husband tries to escape पादचाऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. विकास पाटील असे हल्लोखोर पतीचे नाव आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात Mahatma Fule Police Station जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पतीवर दाखल Crime on husband attempt to kill करून त्याला अटक केली आहे.
चारित्र्याच्या संशयातून नेहमी वादआरोपी पती विकास आणि पत्नी प्रविणा हे कल्याण कसारा रेल्वे मार्गावरील आंबिवली गावात राहतात. आरोपी विकास हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला नेहमी मारहाण करत होता. यावरुन दोघांच्यात नेहमी वाद होत होते. असाच वाद पुन्हा शुक्रवारी रात्री नऊ वाजल्याचा सुमारास दोघांमध्ये झाला. त्यावेळी विकास पाटील, पत्नी प्रविणा कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवरुन घरी जात होते. याावेळी त्यांच्यात चारित्र्याच्या संशय विषयावरुन बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर वादात झाले. यावेळी विकासने जवळील धारदार चाकू काढून त्याने पत्नी प्रविणाच्या गळा, मानेवर सपासप वार केले.