ठाणे : पैशाच्या वादातून पोटच्या मुलाने आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. खळबळजनक बाब म्हणजे आईची हत्या नायलॉनच्या दोरीने गळा आवळून घरात हत्या केली. तिचा मृतदेह पंख्याला लटकवला. आईने मारहाण करुन बेशुद्ध केले आणि त्यानंतर तिने गळफास घेतल्याचा बनाव आरोपी मुलाने रचला होता. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालात आईची हत्या केल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या. ही घटना कल्याण पूर्वेतील हनुमान नगर परिसरातील एका इमारतीत घडली आहे. रवी पुमणी ( वय ३४ ) असे आईची हत्येप्रकरणी अटक मुलाचे नाव आहे. तर सरोजा पुमणी असे हत्या झालेल्या आईचे नाव आहे.
मौजमजा करण्यासाठी पैशाचा तगादा -आरोपी रवी हा मृतक आई सोबत कल्याण पूर्वेतील हनुमाननगर भागात प्रभुकुंज सोसायटीतील तिसऱ्या मजल्यावर राहतो. त्याला नोकरी, व्यवसाय नसल्याने तो नेहमीच मृत आई सरोजाकडे बाहेर मौजमजा करण्यासाठी पैशाचा तगादा लावत होता. मात्र सतत पैसे देणे शक्य नसल्याने मृतक आई सरोजाने त्याला नकार देत होती. त्यातच ५ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास मृत आई सरोजा व आरोपी मुलगा दोघे जण घरात होते. त्यावेळी त्यांच्यात घरगुती वाद होऊन त्याने पुन्हा पैशांच्या विषयावरुन वाद उकरून काढला. मात्र आईने त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या रवीने आईशी भांडण करत तिला बेदम मारहाण करून रागाच्या भरात त्याने आईला जमिनीवर पाडून तिच्या गळ्याला नायलॉनच्या दोरीचा फास लावून तिची हत्या केली.