ठाणे -खगोलशास्त्रात सूर्यग्रहणाला मोठे महत्त्व आहे. असाधारण अशा खगोलीय घटनाक्रमामुळे सूर्यग्रहण घडून येते. अतिशय नैसर्गिक अशी ही क्रिया आहे. दक्षिणेतील केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडूमधून दुर्मीळ असे कंकणाकृती ग्रहण दिसणार आहे. तर राज्यभरातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. ग्रहण म्हणजे शुभ-अशुभ असे काही नसून नैसर्गिक अविष्कार आहे. त्यामुळे ग्रहणाचे निरीक्षण करून त्यामागचे विज्ञान समजून घेतले पाहिजे, असे सोमण यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... मुंबईत पुन्हा बरसल्या सरी; नागरिकांच्या नाताळाच्या उत्साहावर पाणी
खग्रास सूर्यग्रहणाच्यावेळी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब संपूर्ण सूर्यबिंबाला झाकून टाकू शकत नाही. त्यामुळे जरी चंद्रबिंब सूर्यबिंबाच्या आड आले तरी सूर्यबिंबाची गोलाकार आकृती दिसतच राहते. याला ‘ फायर रिंग ‘ असेही म्हणतात. अशावेळी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते. आज गुरुवार २६ डिसेंबर रोजी अशी कंकणाकृती अवस्था दक्षिण भारतातील काही भागात सकाळी सुमारे दोन ते तीन मिनिटे दिसणार आहे. त्यामुळे अनेक खगोलप्रेमी या भागात ग्रहण निरिक्षण करण्यासाठी गेले आहेत.
हेही वाचा... चर्चगेट स्टेशनला 'चर्चगेट' हे नाव कसे पडले माहिती आहे का..?
महाराष्ट्रातून ग्रहणदर्शन
महाराष्ट्रातून सुमारे ८० ते ८४ टक्के सूर्यबिंब चंद्रबिंबामुळे झाकलेला दिसणार आहे. गुरुवारी मुंबईतून सकाळी ८ वाजून ४ मिनिटांनी सूर्यग्रहणास प्रारंभ झालेला दिसेल. ग्रहणमध्य सकाळी ९ वाजून २२ मिनिटांनी होईल. त्यावेळी जास्तीत जास्त सूर्यबिंब चंद्रबिंबामुळे झाकलेले दिसेल. सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल. चंद्रग्रहण जिथून दिसते त्यावेळी सर्व ठिकाणांहून एकाचवेळी ते दिसत असते.