ठाणे -महापालिका शिक्षण विभाग, नगररचना विभाग, शहर विकास विभाग आणि माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीत भ्रष्टाचार सुरू असल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून येत होत्या. याबाबत वेळोवेळी तक्रार केल्यानंतरही त्याची दखल घेण्यात येत नव्हती. तसेच माहितीच्या अधिकारात उडवाउडवीची उत्तरे देऊन बोळवण करण्यात येते. याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील विश्राम गृह येथे 24 फेब्रुवारी पासून आरटीआय कार्यकर्ता दत्ता संभाजी गायकवाड यांनी आमरण उपोषण पुकारले आहे.
पालिकेच्या अनागोंदी कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्त्याचे उपोषण - thane agitation news
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील विश्राम गृह येथे 24 फेब्रुवारी पासून आरटीआय कार्यकर्ता दत्ता संभाजी गायकवाड यांनी आमरण उपोषण पुकारले आहे.
घोडबंदर रस्ता हायपरसिटी एम.बी.सी. पार्क येथे विकास आराखड्यात बदल करून गृह संकुलासाठी सोयीचा रस्ता करणे, गरिबांचे विस्थापन, हॉलीक्रॉस फॅमिली शाळेशेजारी सार्वजनिक नाल्यावर भिंतीचे बांधकाम, शिक्षण विभागाच्या अटींची पूर्तता न करता सुरू असलेली कासार-वडवली येथील बेकायदेशीर कामे यांबाबत वारंवार तक्रार अर्ज करूनही पालिकेने कोणतीही कारवाई केली नाही. तसेच यासंबंधी आरटीआयमध्ये मागितलेली माहिती देण्यास देखील अधिकाऱयांनी टाळाटाळ केली. याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते दत्ता गायकवाड यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.