महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Snake found In Custody : बापरेबाप आरोपीच्या कोठडीत शिरला भलामोठा साप - अंबरनाथमधील घटना

अंबरनाथ ( Ambarnath ) शहरातील पूर्वेकडील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आरोपींच्या कोठडीत भलामोठा साप ( Snake In The Accuseds Cell ) आढळला. या घटनेमुळे पोलिस ठाण्यात एकच गोंधळ उडाला. सर्पमित्रने हा साप पकडला आणि पोलिसांनी पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

आरोपीच्या कोठडीत साप
आरोपीच्या कोठडीत साप

By

Published : Jul 2, 2022, 9:28 PM IST


ठाणे -शनिवारी पहाटेच्या साडेतीन वाजण्याच्या सुमारास शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या कोठडीत अचानक चार फुटाचा साप शिरला. ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना साप दिसताच एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी तातडीने याच परिसरात राहणारे सर्पमित्र प्रकाश गोयल यांना पाचारण करण्यात आले.

आरोपीच्या कोठडीत निघाला साप

सर्पमित्राने पकडले सापाला -माहिती मिळताच सर्पमित्र प्रकाश हे घटनास्थळी आले. त्यांनी अत्यंत शांत चित्ताने काही वेळातच आरोपीच्या कोठडीतून सापास सुरक्षित पकडले. साप शिरला त्यावेळी पोलीस कोठीत आरोपी नसल्याने कोणताही अनर्थ घडला नाही. हा साप धिवड जातीचा असून बिनविषारी आहे. या सापाला वन अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन नजीकच्या जंगलात सोडण्यात आल्याची माहिती सर्पमित्र गोयल यांनी दिली आहे.

हेही वाचा -Umesh Kolhe Murder Case: कोल्हेंनी गाडी थांबवली अन् त्याने क्षणार्धात गळा चिरला; वाचा त्या रात्रीची थरारक कहाणी

ABOUT THE AUTHOR

...view details