महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

किरकोळ कारणावरून चप्पल-बूट दुकानदाराला त्रिकुटाची मारहाण - thane crime news

याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात हल्लेखोर त्रिकुटाविरोधात गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय पिल्ले असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अशोक वानखडे व 2 साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

दुकानदाराला मारहाण
दुकानदाराला मारहाण

By

Published : Aug 8, 2021, 7:11 PM IST

Updated : Aug 8, 2021, 7:49 PM IST

ठाणे -चप्पल-बूट विक्री करणाऱ्या दुकान मालकाशी किरकोळ कारणावरून वाद घालत टवाळखोर गुंडाच्या त्रिकुटाने मालकासह नोकराला लोखंडी रॉडने मारहाण करीत जबर दुखापत केल्याची घटना घडली आहे. ही घटना उल्हानसागर कॅम्प नं. १ भागातील राहुल शूज या दुकानात घडली आहे. विशेष म्हणजे गुंडांकडून दुकान मालक नोकराला झालेल्या बेदम मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात हल्लेखोर त्रिकुटाविरोधात गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय पिल्ले असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अशोक वानखडे व 2 साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

३ दिवसांपूर्वी झाला होता वाद

उल्हासनगर कॅम्प नंबर १ परिसरात सुरेश छाब्रिया यांचे राहुल शुज नावाचे दुकान आहे. या दुकानाचे मालक सुरेश छाब्रिया आणि मुख्य आरोपी अशोक वानखेडे यांच्यामध्ये ३ दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाले होते. याच वादातून काल रात्रीच्या सुमारास मुख्य आरोपी वानखडे हा दोघा साथीदाराला घेऊन दुकानासमोर आला. त्याने शिवीगाळ करीत अचानक लोखंडी रॉडने दुकानात काम करणारा कामगार दीपक छाब्रिया याला लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. दुकानाचे मालक आणि अन्य कामगार त्याला सोडवायला मध्ये गेले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली.

हल्ल्यात कामगाराचा पाय फ्रॅक्चर

या मारहाणीत कामगार दीपक छाब्रिया याचा एक पाय फ्रॅक्चर झाला आहे. तर मारहाणीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर पोलिसांनी काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करत तपासाची चक्र फिरवत काही तासातच अक्षय पिल्ले या एका हल्लेखोराला बेड्या ठोकल्या. तर मुख्य आरोपी अशोक वानखेडे आणि अन्य २ असे तीन आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही अटक केली जाईल, अशी माहिती उल्हासनगरचे सहायक पोलीस आयुक्त धुळा टेळे यांनी दिली आहे.

Last Updated : Aug 8, 2021, 7:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details