महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Parambir Singh : ठाणे नगर पोलिसांनी परमबीर सिंग यांचा नोंदवला चार पानी जवाब - Non-bailable Warrant Cancelled

सोनू जालान खंडणी प्रकरणात ठाणे नगर पोलिसांनी परमबीर सिंग (Parambir Singh) यांची तब्बल 7 तास चौकशी केली.या चौकशीला सामोरे जात परमबीर सिंग (Parambir singh denies the allegation) यांनी सर्व आरोप नाकारले.

Parambir Singh
परमबीर सिंग बाहेर पडताना

By

Published : Nov 26, 2021, 9:27 PM IST

ठाणे :- सोनू जालान खंडणी प्रकरणात ठाणे नगर पोलिसांनी परमबीर सिंग (Parambir Singh) यांची तब्बल 7 तास चौकशी केली. या चौकशीला सामोरे जात परमबीर सिंग (Parambir singh denies the allegation) यांनी सर्व आरोप नाकारले. शुक्रवारी 4 पानांचे जबाब ठाणे नगर पोलिसांनी नोंदवला. तर Sit टीम समोर सर्व चौकशी झाली. पुढील चौकशीसाठी कधीही बोलवून चौकशी केली जाईल अशी नोटीस ठाणे नगर पोलिसांनी परमबीर सिंग यांना बजावली आहे.

परमबीर सिंग यांची सात तास चौकशी


परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी चौकशी दरम्यान पोलिसांना सहकार्य केल्याची माहिती उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली. मुंबई आणि ठाणे येथे झालेल्या चौकशीनंतर आता पुढील चौकशीसाठी परमबीर सिंग (Parambir Singh) हे Cid समोर जाण्याची शक्यता आहे. परमबीर सिंह हे ठाणे न्यायालयात गेले होते. तर महत्वाचे म्हणजे परमबीर सिंग यांच्या विरोधातला अटक वॉरंट ठाणे कोर्टाने रद्द केले आहे. ठाणे कोर्टाने वॉरंट रद्द करताना परमबीर सिंह यांना कोर्टाने दोन अटी घातल्या आहेत. त्यामुळे सध्या तरी परमबीर सिंह यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. परमबीर सिंह यांना जेव्हा तपास अधिकारी चौकशीसाठी बोलावतील, तेव्हा सिंह यांनी चौकशीसाठी उपस्थित राहायचे आहे. तसेच 15 हजाराच्या वैयक्तिक जामीनावर त्यांचे वॉरेंट रद्द करण्यात आले आहे. गेले अनेक दिवस परमबीर सिंग यांच्या प्रकृतीमुळे ते समोर येत नसल्याचे त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केले. तर परमबीर सिंग याना पुढील चौकशीसाठी न्यायालयात कधीही हजर राहावे लागेल, अशी माहिती परमबीर सिंग यांचे वकील राजेंद्र मोकाशी यांनी यावेळी दिली.


सहा तासापेक्षा अधिक तास चौकशी
शुक्रवारी सकाळी ११ वाजता ठाणे नगर पोलीस ठाण्यात परमबीर सिंग आले. ते दुपारी कोर्टात जाऊन अटक वारंट रद्द करून, ठाणे नगर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आले. त्यांनतर रात्री ७ वाजेपर्यंत परमवीर सिंग यांची चौकशी सुरु होती. अखेर ७ वाजता बाहेर पडले आणि मुंबईकडे रवाना झाले. परमबीर सिंग यांचा चार पानांचा जबाब नोंदविण्यात आला आहे .

मदत करणारे पोलीस चौकशी काय करणार ?
खंडणीच्या गुन्ह्यात अडकलेले आणि फरारी झालेले माजी आयुक्त परमवीर सिंग यांच्या गुन्ह्याचा तपास करणारे अधिकाऱ्यांनी कायद्याचा लपंडाव खेळत संरक्षण देण्याचे कटकारस्थान केले. यावर नियुक्त विशेष सरकारी वकिलांनीही आक्षेप घेत पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली. तर दुसरीकडे पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे आरोपीना मदत झाल्यावर आक्षेप व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा -Non-bailable Warrant Cancelled : परमबीर सिंग यांच्याविरोधातले अजामीनपात्र वॉरंट ठाणे न्यायालयाने केले रद्द

ABOUT THE AUTHOR

...view details