ठाणे- शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने पाठवलेल्या नोटीसनंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत. मुंबईत ईडी कार्यालयावर बॅनर लावल्यानंतर डोंबिवलीतही ठिकठिकाणी खासदार संजय राऊत यांच्या समर्थनाचे बॅनर झळकलेले दिसत आहेत.
ईडीने खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठवल्याने शिवसेनेत संतापाचे वातावरण आहे. शिवसैनिक आणि सेना पदाधिकारी ईडीच्या नोटीसनंतर आक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी मुंबईमध्ये ईडीच्या ऑफिसबाहेर बॅनर लावले होते. त्यापाठोपाठ डोंबिवली स्टेशन परिसरातील चौका-चौकांत शिवसेना नेते संजय खासदार संजय राऊत यांच्या समर्थनाचे बॅनर लावण्यात आले आहेत.
खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर हल्ला चढवत इशाराही दिला. राऊत यांच्या याच वक्तव्याचा दाखला देत त्यांच्या विधानाचे बॅनर डोंबिवलीत झळकलेले दिसत आहेत.
दरम्यान, ईडीने यापूर्वी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनाही नोटीस बजावली होती.