ठाणे - कल्याण पूर्व मतदारसंघात येणाऱ्या उल्हासनगरमध्ये भाजप उमेदवार गणपत गायकवाड यांच्या बॅनरवरील शिवसेना नगरसेवकांचे फोटो फाडण्यात आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. दुसरीकडे या घटनेने सेना-भाजप वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
सेना नगरसेवकांनी फाडले भाजप उमेदवाराच्या बॅनरवरील स्वतःचे फोटो - Thane shivsena Corporator news
कल्याण पूर्व मतदारसंघात येणाऱ्या उल्हासनगरमध्ये भाजप उमेदवार गणपत गायकवाड यांच्या बॅनरवरचे शिवसेना नगरसेवकांचे फोटो फाडल्याचे समोर आले आहे. सेनेच्या बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे यांना उल्हासनगरमधील काही सेना नगरसेवकांनी पाठिंबा दिल्यामुळे त्यांनी स्वता बॅॅनरवचे फोटो फाडल्याचे बोलले जात आहे.
या बॅनरवरील फोटो सेनेच्या नगरसेवकांनीच काढायला लावले आहेत. सेनेचे बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे यांना उल्हासनगरमधील काही सेना नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने त्यानी स्वतःच या बॅनर वरील आपले फोटो फाडले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे उल्हासनगरमध्ये सेना भाजप संघर्ष आता चांगलाच उफाळून आला आहे.
कल्याण पूर्व मतदारसंघातील उल्हासनगर कॅम्प नंबर ४ परिसरात शिवसेनच्या मध्यवर्ती शाखेवर भाजप उमेदवार गणपत गायकवाड यांचे बॅनर लावण्यात आले होते. याआधी हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्याने उल्हासनगर आणि कल्याणमधील सेनेच्या २८ नगरसेवकांनी सामूहिकरित्या पक्ष नेतृत्वकडे राजीनामे दिले आहेत. यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात या मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.