महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शिवसेना महापौर नरेश म्हस्के यांची राणे समर्थनार्थ नारेबाजी; व्हिडिओ झाला व्हायरल - narayan rane arrest

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्यामुळे शिवसैनिकामध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. असताना ठिकठिकाणी सेनेचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले होते. काही ठिकाणी भाजपच्या कार्यालयावर हल्ले देखील करण्यात आले होते.

naresh mhaske
व्हिडिओ झाला व्हायरल

By

Published : Aug 24, 2021, 7:54 PM IST

ठाणे - एकीकडे भाजप आणि शिवसेनेमध्ये तुफान घोषणाबाजी सुरू असताना ठाण्यातदेखील विविध ठिकाणी शिवसैनिकांनी आंदोलन केले. याच दरम्यान ठाण्याचे शिवसेनेचे महापौर नरेश म्हस्के यांनी चक्क राणेंच्या बाजूने घोषणाबाजी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. "नारायण राणे अंगार है, बाकी सब भंगार हैं !" या आशयाची घोषणा यावेळी महापौर म्हस्के यांनी आंदोलनात दिली.

राणे समर्थनार्थ नारेबाजी
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्यामुळे शिवसैनिकामध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. असताना ठिकठिकाणी सेनेचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले होते. काही ठिकाणी भाजपच्या कार्यालयावर हल्ले देखील करण्यात आले होते. ठाण्यातही भाजपच्या कार्यालयाच्या दिशेने जात असताना महापौर नरेश म्हस्के यांनी घोषणाबाजी सुरू केल्या. यावेळी म्हस्के यांनी नारायण राणे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

खोडसाळ लोकांनी बनवला महापौर
म्हस्के यांच्या घोषणेमुळे भाजप कार्यकर्त्यांना आयते कोलीत मिळाल्याने महापौरांना ट्रोल करण्याची संधी भाजप कार्यकर्त्यांनी सोडली नाही. दरम्यान त्या आंदोलनाचा धसका घेवून हा व्हिडीओ खोडसाळपणे तयार करुन व्हायरल करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे म्हस्के यांनी सांगितले.

हेही वाचा -आधी मुख्यमंत्र्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - नितेश राणे

ABOUT THE AUTHOR

...view details