ठाणे - सध्या राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तसेच राज्यात सत्तापरिवर्तन होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर नगर विकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे नॉट रीचेबल झाले होते. त्यानंतर काल दिवसभर राजकीय गदारोळ सुरू होता. मात्र आज ( बुधवारी ) ठाण्यातील काही शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे ( support Banners of Eknath Shinde Thane ) यांना पाठिंबा दर्शविला आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत शिवसेनेकडून नाराजी व्यक्त होत असताना आंदोलन आणि निदर्शन सुरु आहेत. दुसरीकडे मात्र ठाण्यातील कळवा परिसरातील काही एकनाथ शिंदे समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली आहे. 'आम्ही शिंदे साहेब समर्थक' अशा आशयाचे बॅनर शिंदे समर्थकांनी लावले आहे. या बॅनरमधून चक्क उद्धव ठाकरे यांचा फोटो देखील वगळला आहे.
Eknath Shinde Support Banner : ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ लागले बॅनर - कनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ लागले बॅनर
ठाण्यातील काही शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे ( support Banners of Eknath Shinde Thane ) यांना पाठिंबा दर्शविला आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत शिवसेनेकडून नाराजी व्यक्त होत असताना आंदोलन आणि निदर्शन सुरु आहेत. दुसरीकडे मात्र ठाण्यातील कळवा परिसरातील काही एकनाथ शिंदे समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली आहे. 'आम्ही शिंदे साहेब समर्थक' अशा आशयाचे बॅनर शिंदे समर्थकांनी लावले आहे.
'आम्ही एकनाथ शिंदेंचे समर्थक' :आम्ही एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असून शेवटच्या क्षणापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या बाजूने उभे राहू. एकनाथ शिंदे ज्या पक्षामध्ये प्रवेश करतील त्याला आमचे समर्थन असल्याचे शिंदे समर्थकांकडून सांगण्यात आले आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यभरात त्यांच्या विरोधात आंदोलन आणि निदर्शने होत असताना एकनाथ शिंदे यांच्या समर्थनासाठी ठाण्यात पोस्टर लागले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा -Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर, शिवसैनिक रस्त्यावर