ठाणे -राज्यात सत्ता संघर्ष सुरू असताना दसरा मेळाव्याची तयारी ( Dussehra Melawa ) शिंदे गट, उद्धव गटाकडून मोठ्या प्रमाणात सुरु असल्याच दिसून येत आहे. तसंच शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) असल्याने ठाण्यातील शिवसैनिकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे. त्यामुळे ठाणे शहरातून अडीचशेहून अधिक गाड्याया बीकेसी मैदानावरती ( BKC ground ) पोहोचणार आहेत.
दसरा मेळाव्यासाठी शिंदे, ठाकरे गटाची जय्यत तयारी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह -महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून, खेड्यापाड्यातून तसेच शहरातून देखील मोठ्या प्रमाणात शिवसैनिक मुंबईतील बीकेसी येथे दसरा मेळाव्यासाठी येणार आहेत. इथे येऊन शिवसैनिक एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांचे विचार ऐकणार आहेत. तसेच अनेक नेत्यांचे विचार देखील ऐकणार आहेत, त्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा पहिलाच मेळावा - बीकेसी मैदानावरशिंदे गटाच्याही या पहिल्या दसरा मेळाव्यासाठी चार ते पाच लाखांच्यावर कार्यकर्ते बीकेसी मैदानावर धडकणार असल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के ( Shinde group spokesperson Naresh Maske ) यांनी सांगितले आहे . कार्यकर्त्यांची होणारी गर्दी लक्षात घेता संपूर्ण वाहतूक व्यवस्था करण्याची तयारी सुरू झालेली आहे. त्याप्रमाणे कलिना विद्यापीठ ( Kalina University ) किंवा आजूबाजूच्या इतर मोकळ्या जागेमध्ये 4 हजार ते 5 हजार बस संख्या मावेल अशा प्रकारची वाहनतळ योजना देखील शिंदे गटाकडून करण्यात आलेली आहे.
दसरा मेळाव्यासाठी शिंदे, ठाकरे गटाची जय्यत तयारी ठाकरे गटात उत्साह नाही - अनेक लोक हे मेळाव्यासाठी येणार आहेत फक्त महाराष्ट्रातून नाही तर, अनेक राज्यातून देखील हिंदुत्वाचे विचार ऐकण्यासाठी एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी येणार आहेत. असे देखील नरेश मस्के यांनी सांगितले. उद्धव गटातून जे कोण येणार आहेत त्यांच्यात उत्साहच उरला नाही. त्यामुळे अशा प्रकारचे शांततेत येण्याचे आव्हान उद्धव ठाकरे करत आहेत. अशा प्रकारच वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केल आहे.
शिवसेना पुन्हा उभी राहणार -शिवतीर्थावर सभेला सर्वात जास्त गर्दी होईल असा दावा उद्धव गटाचे खासदार राजन विचारे यांनी केला. ठाणे जिल्हा असेल कल्याण डोंबिवली असेल येथून शेकडो कार्यकर्ते शिवतीर्थावर येणार आहेत, त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या वरती असलेल्या प्रेमापोटी अनेक शिवसैनिक हे लांबून लांबून पायी चालत येत आहेत असे, देखील यावेळी राजन विचारे यांनी सांगितले. या अशाच निष्ठावान सैनिकांचा मला अभिमान आहे आणि यांच्यामुळेच शिवसेना पुन्हा उभी राहणार आहे असा विश्वास देखील यावेळी राजन विचार यांनी व्यक्त केला.
शेकडो वाहनांचे नियोजन -दसरा मेळाव्यासाठी शिंदे गट, उद्धव ठाकरे गटांकडून कार्यकर्त्यांना येण्यासाठी खाजगी बसेस राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस खाजगी चार चाकी वाहने या यांचं नियोजन करण्यात आलं आहे. जाताना, येताना वाहतूक कोंडी होणार असल्यामुळे वाहतूक पोलीस देखील त्यासाठी सतर्क झालेले आहेत. आतापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून राज्य परिवहन महामंडळाच्या 35 बसेस बुकिंगही करण्यात आल्या आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे गटाकडूनही खाजगी बसेस बुक करण्यात आलेल्या आहेत.
आनंद नगर नाक्यावरती भिडू शकतात दोन्ही गट -ठाण्यातील मुंबईकडे जाणारा एन्ट्री पॉईंट म्हणजे आनंदनगर चेक नाका शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या मेळाव्यासाठी याच आनंद नगर नाक्यावरून पुढे जावं लागणार आहे. याच आनंद नगर नाक्यावरती दोन्ही गट भिडू देखील शकतात. यासाठी पोलिसांनी आवश्यक ती उपाययोजना केली आहे. मेळाव्याच्या आधी 24 तास या ठिकाणी पोलीस तैनात राहणार असून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी देखील घेतली जाणार आहे.