ठाणे - कल्याण-डोंबिवली मार्गावरील विकास नाक्यावर आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास भरधाव डंपरने दुचाकीला चिरडले. या अपघातात पती-पत्नीसह मुलगी असे तिघेजण जागीच ठार झाले. गणेश चौधरी (वय-32), ऊर्मिला चौधरी (वय-25) आणि मुलगी हंशीका (वय-4) अशी मृतांची नावे असून यामध्ये त्यांचा मुलगा बचावला आहे.
भरधाव डंपरखाली चिरडून पती-पत्नीसह मुलगी जागीच ठार; मुलगा गंभीर
कल्याण-डोंबिवली मार्गावरील विकास नाक्यावर आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास भरधाव डंपरने दुचाकीला चिरडले. या अपघातात पती-पत्नीसह मुलगी असे तिघेजण जागीच ठार झाले.
गणेश हे सहकुटुंब कल्याण-डोंबिवली मार्गावरील कथोरे रस्त्यावरून विकास नाक्याच्या दिशेने दुचाकीवर जात होते. याचवेळी डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले. मात्र त्यांचा लहान मुलगा बचावला असून त्याला तात्काळ रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची महिती मिळताच कोळसेवाडी युनिटचे वाहतूक पोलीस फौजदार काशिनाथ चौधरी व मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यानंतर तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. पोलिसांनी अपघातग्रस्त डंपर ताब्यात घेतला आहे.